‘महिला सक्षमीकरण व स्वास्थ्या’वर अहमदपूरच्या फुले महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

0
'महिला सक्षमीकरण व स्वास्थ्या'वर अहमदपूरच्या फुले महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

'महिला सक्षमीकरण व स्वास्थ्या'वर अहमदपूरच्या फुले महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात महिला दिनाचे व सावित्रीबाई फुले स्मृतीदिनाचे औचित्य साधून दि. १० मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता युवती कल्याण विभागाच्या वतीने ‘महिला सक्षमीकरण व स्वास्थ्य ‘ या विषयावर आभासी पद्धतीने एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या आय. क्यू.ए. सी. अंतर्गत युवती कल्याण मंडळाच्या वतीने महिला दिनाचे व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून ‘महिला सक्षमीकरण व स्वास्थ्य’ या विषयावर प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन आभासी (ऑन लाईन) पद्धतीने करण्यात आले आहे.
या चर्चासत्राचे उद्घाटन पुणे येथील डी. वाय. पाटील कॉलेजच्या प्रसिद्ध वैद्य तथा प्रा. सौ. ओजदा चंद्रशेखर पोळ यांच्या हस्ते होणार असून या चर्चासत्राला महाराष्ट्र प्रांत ग्लोबल संस्कृत फोरम, दिल्ली शाखा मंत्रालय मुंबईच्या अध्यक्षा डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर संस्कृत ग्लोबल फोरम दिल्लीचे सचिव राजेश मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन झूम ॲप वर करण्यात आले असून चर्चासत्रात महिला व पुरूषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन मुख्य संयोजक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील,युवती कल्याण विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सीमा उप्पलवार, सहायक प्रा. कल्पना कदम, प्रा. प्रतीक्षा मंडोळे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रो.अनिल महाराज मुंढे, प्रा. डॉ. प्रशांत बिरादार आदींनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!