पॅराडाईज प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वतीने पहिल्या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन

0
पॅराडाईज प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वतीने पहिल्या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन

पॅराडाईज प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वतीने पहिल्या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील पॅराडाईज प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वतीने पहिल्या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दि ०९ मार्च रोजी शिव पार्वती मंगल कार्यालय शिरूर ताजबंद येथे सकाळी १० : ३० वाजता आयोजीत करण्यात आले आहे

वार्षिक स्नेह संमेलन शैक्षणिक आयुष्याचा महत्वाचा भाग असून यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त कलगुणांना मंचाद्वारे सर्वांसमोर मांडण्याची संधी मिळते. यामुळे पालकांना देखील आपल्या मुलांमधील हुनर ओळखण्यास मदत मिळते. खेळाडू असेल किंवा कलाकार त्याची सुरुवात ही शाळेतील स्नेहसंमेलन कार्यक्रमातूनच होते.
हाच धागा पकडून पॅराडाईज प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल शिरूर ताजबंद यांच्या वतीने पहिल्या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन दि ०९ मार्च रोजी सकाळी १०: ३० वाजता शिव पार्वती मंगल कार्यलय शिरूर ताजबंद येथे करण्यात आले आहे
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असुन अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणुन मंचकराव पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर, बबनराव ढोकाडे गट शिक्षण अधिकारी अहमदपूर, साहेबराव पाटील संस्थापक सरपंच शिरूर ताजबंद,किशनरावजी माने संस्थापक, वायगाव शिक्षण प्रसारक मंडळ, वायगाव,.कासार सर क्लस्टर हेड, Z.P.CPS, शिरूर ताजबंद,शामरावजी टिकोरे माजी अध्यक्ष- व्ही.व्ही.के. सोसायटी, कुमठा बीके,केशव मुंडकर HM, Z.P.C.P.M., शिरूर ताजबंद आदींची उपस्थिती राहणार आहे
शिरूर ताजबंद परिसरातील विद्यार्थी पालक यांच्यासह नागरीकांनी स्नेह संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन गणपती सतीश बर्डे सचिव, स्वामी व्ही.बी.एस. संस्था शालिनी एस. कुमठेकर (बर्डे) मुख्याध्यापिका यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!