महात्मा फुले महाविद्यालयात सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त विविध फुलांच्या प्रदर्शनाचे आयोजन

0
महात्मा फुले महाविद्यालयात सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त विविध फुलांच्या प्रदर्शनाचे आयोजन

महात्मा फुले महाविद्यालयात सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त विविध फुलांच्या प्रदर्शनाचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात थोर समाज सुधारक स्त्री शिक्षणाच्या अग्रदुत सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यासाठी १० मार्च २०२५ रोजी फुले सभागृहात विविध फुलांचे ‘ फुले प्रदर्शन – २०२५ ‘ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या आयक्युएसी विभागांतर्गत भूगोल विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध फुलांचे ‘फुले प्रदर्शन -२०२५ ‘ चे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनासाठी भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एन. माने व डॉ. सचिन गर्जे यांचे फुलांच्या विविध जाती व त्याचे फायदे आणि या फुलांची लागवड कशी करावी , जोपासना कशी करावी या व इतर बाबींवर मुलांसमोर प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार असून याचा लाभ निसर्गप्रेमी व भविष्यात फुलांची शेती व व्यवसाय करणाऱ्यांना होणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला देतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, शिक्षणातून व्यवसायाच्या संधी या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

चौकट
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अनेकांच्या जीवनात असलेल्या अज्ञानाचा दाटलेला गडद अंधार दूर करून त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरला… त्यांना फुले दांपत्यानी उजेड प्रदान केले…. त्यामुळे त्यांचे जीवन चैतन्यमय झाले… फुलले… बहरले… फुलांसारखे टवटवीत झाले… म्हणूनच महिला दिनानिमित्त व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त आणि महाविद्यालय २५ व्या वर्षात असल्याने विविध २५ फुलांचे म्हणजेच ‘फुले- २०२५ ‘ या अभिनव अशा विविध फुलांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सृजनशील ललित लेखक तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी नमूद केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!