जागतिक महिला दिन विद्यालयात साजरा करण्यात आला

0
जागतिक महिला दिन विद्यालयात साजरा करण्यात आला

जागतिक महिला दिन विद्यालयात साजरा करण्यात आला

अहमदपूर (गोविंद काळे) : दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिन जय हिंद प्रयाग प्राथमिक शाळा व अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव पुष्पाताई माने प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रप्रमुख शोभाताई शेळके माने, मुख्याध्यापिका वंदना भदाडे विद्यालयातील सर्व शिक्षिका यावेळी मंचावर उपस्थित होत्या.
प्रमुखातेने आपल्या भाषणात त्यांच्या जीवनातील संघर्ष त्यावर केलेली त्यांनी मत इच्छाशक्ती, मेहनत व योग्य नियोजन याद्वारे प्राप्त केलेले यश त्यांच्या जीवनातील बलस्थाने, त्यातून त्यातून मिळणारी प्रेरणा हे आयुष्याचा गमक आहे असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक स्त्रीने शिकला पाहिजे आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि प्रत्येक संकटाला सामोरे गेला पाहिजे हेही त्यांनी सांगितलं. अध्यक्षीय भाषणात सचिव आणि सांगितलं की विद्यालयातील प्रत्येक मुलींसाठी भरपूर अशा सुविधा ही संस्था उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे.
विद्यालयातील अनन्या भोयेवार, प्रगती गुंडले, मयुरी वाघमारे, गायत्री सूर्यवंशी या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षिका यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कदम यांनी केला तर आभार नितीन सुडे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!