संत ज्ञानेश्वर विद्यालयात जागतिक महिला दिन व खरी कमाई उत्साहात संपन्न
संत ज्ञानेश्वर विद्यालयात जागतिक महिला दिन व खरी कमाई उत्साहात संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात जागतिक महिला दिन व खरी कमाई बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव प्राचार्या रेखाताई हाके-तरडे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था समन्वयक कुलदीप भैय्या हाके, मुख्याध्यापक आशा रोडगे,मुख्याध्यापक मीना तोवर सह शिक्षक पालक संघाचे सदस्य उपस्थित होते.
प्रथमतः जागतिक महिला दिनानिमित्त संस्था सचिव तथा प्राचार्या रेखाताई तरडे- हाके यांच्या हस्ते सर्व महिला शिक्षकांचा पेन व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलचे उद्घाटन संस्थेचे समन्वयक कुलदीप हाके पाटील यांनी केले. सदरील विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर सतीश साबणे, ज्ञानेश्वर चव्हाण, गाईड कॅप्टन संजीवनी गुरमे, अश्विनी घोगरे, शबाना शेख, सुजाता बुर्गे आदींनी विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, पैशाची देवाण घेवाण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. खरी कमाई उपक्रमांतर्गत विद्यार्थी हेच मालक व ग्राहक बनले.या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उद्योगधंदा, दैनंदिन व्यवहार ,खरेदी विक्रीचा अंदाज, श्रमाच्या सवयींचा सुंदर वस्तू पाठ म्हणजेच स्काऊट गाईड ची खरी कमाई होय. विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व कळावे ,विक्री कौशल्याची ओळख व्हावी या उद्देशाने प्रतिवर्षी शाळेमध्ये मोठ्या उत्साहात आनंद मेळावा, खरी कमाई ही संकल्पना राबविली जाते. शालेय जीवनापासूनच मुलांना स्वावलंबनाचे धडे देणारा स्काऊट गाईडचा हा एक उत्कृष्ट असा उपक्रम आहे. या खरी कमाई उपक्रमात एकूण 71 विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावले होते. तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी खरेदी करून सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार शबाना शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
