संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या 23 विद्यार्थ्यांची गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड
संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या 23 विद्यार्थ्यांची गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या 23 विद्यार्थ्यांनी राज्य गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत यश संपादन केले आहे.
या परीक्षेला पाचवीचे एकूण 42 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 23 विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यात वीरा गुदळे, श्रावस्ती ससाने ,पार्थ बोंडगे ,समरवीर जाधव, श्रेयस देशमुख, अभिजीत चाटे, राजवीर मुंढे, चैतन्य पांचाळ, सुदर्शन घोगरे, अथर्व शिंदे, साई केसगिरे, आदित्य झरीकुंटे, हर्षदा हांडे, वैष्णवी ढाकणे ,प्राची कदम ,आरोही बेंबडे, विराज स्वामी, शेख सादेक ,पार्थ किरडे, पायल उपासे, श्लोक आलापुरे ,आदिश्री ताटीपामुलवार, युवराज वलसे यांचे कौतुक करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांना सविता पाटील, प्राजक्ता भोसले, सविता करंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष गणेश दादा हाके, सचिव प्राचार्या रेखाताई हाके-तरडे, उपाध्यक्षा एडवोकेट मानसी हाके ,संस्था समन्वयक कुलदीप भैय्या हाके, अमरदीप हाके, मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
