स्त्री ही कुटुंब व शेती व्यवस्थेचा कणा आहे – योगशिक्षका वृषाली चवळे
स्त्री ही कुटुंब व शेती व्यवस्थेचा कणा आहे - योगशिक्षका वृषाली चवळे
अहमदपूर (गोविंद काळे) : स्त्री ही ग्रामीण कुटुंब व्यवस्था व शेती व्यवस्थेचा कणा असून, स्त्री मुळेच कुटुंब विवाह स्थळ टिकून असल्याचे प्रतिपादन योगशिक्षिका वृषाली चवळे यांनी ढाळेगाव येथे जि प प्रा शा येथे महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील जयश्रीताई परगणे ह्या होत्या. तर मंचावर प्रा.अनिल चवळे, जनार्दन कदम, शिवकांता शेकडे, कोंडमगिरे ताई
शाळेचे मुख्याध्यापक शंकर कदम हे होते. अगदी पहाटेपासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत स्त्री ही आपल्या कुटुंबाचा गाडा ओढताना दिसते. घरातील सर्व कामे करून स्त्री ही पुरुषाला शेतीमध्ये सर्व कामांमध्ये सहकार्य करते. शेतीमधील बारकावे समजून घेऊन पुरुषासोबत खंबीरपणे उभा टाकून स्त्री त्यास मदत तर करतच असते याशिवाय घरातील असलेले सर्व नाते सांभाळत असते. घरातील धुने ,भांडे ,स्वयंपाक हे काम स्त्रीकडेच असते व यांच्या आरोग्याची काळजी ही स्त्री घेत असते मात्र स्वतःकडे तिचे प्रचंड दुर्लक्ष होत असते. यासाठी स्त्रियांनी स्वतःचे आरोग्य सुद्धा सांभाळणे गरजेचे आहे कारण ती सशक्त राहिली तरच तुम बसू शकतो राहू शकते असे त्या यावेळी म्हणाल्या.
या कार्यक्रमास ढाळेगाव येथील महिला , अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा सेविका मोठी संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन सूर्यवंशी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटील मॅडम यांनी केले तर आभार मुख्याध्यापक शंकर कदम सर यांनी मांडले.
