इनरव्हील क्लब च्या वतीने ग्रामीण रुग्णालयात महिलांना साडी चोळी वाटप
इनरव्हील क्लब च्या वतीने ग्रामीण रुग्णालयात महिलांना साडी चोळी वाटप
अहमदपूर (गोविंद काळे) : जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या 30 महिलांना व सफाई कामगार महिलांना साडी चोळी वाटप करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा विजया भुसारे-रोडगे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अंजली उगिले, प्राचार्य रेखाताई तरडे- हाके, डॉ. मीनाक्षी करकनाळे,वैशाली चामे, डॉ.नेहा पाटील, डॉ. अर्चना मजगे, संगीता खंडागळे सह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राष्ट्रमाता जिजाऊ व धन्वंतरी च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ.अंजली उगिले यांनी उपस्थित महिलांना आहार व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.मनकर्णा चिवडे पाटील यांच्या वतीने महिलांना साडी चोळी वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मनकर्णा पाटील यांनी केले.सूत्रसंचालन कलावती भातांब्रे यांनी केले तर आभार सचिव रेखा बालुरे यांनी मानले. कोषाध्यक्षा सुरेखा उगिले, सुनीता गुणाले, शिल्पा हंगरगे, जया बिराजदार यांच्या सह आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती.
