पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे पहिले वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

0
पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे पहिले वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे पहिले वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील पॅराडाईज इंग्लिश स्कुलचे पहिले वार्षिक स्नेह संमेलन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिव पार्वती मंगल कार्यालय शिरूर ताजबंद ते दि ०९ मार्च रोजी सकाळी १० : ३० ते ०२ : ३० वाजेपर्यंत उत्साहात संपन्न झाले

तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील पॅराडाईज इंग्लिश स्कुलच्या पहिल्या वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन दि ०९ मार्च रोजी सकाळी १० : ३० वाजता शिव पार्वती मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदीया जिल्हयाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साहेबराव जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन बाळासाहेब जाधव माजी राज्यमंत्री,मंचकराव पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर, बबनराव ढोकाडे गट शिक्षण अधिकारी अहमदपूर, साहेबराव पाटील संस्थापक सरपंच शिरूर ताजबंद,किशनरावजी माने संस्थापक, वायगाव शिक्षण प्रसारक मंडळ, वायगाव,.कासार सर क्लस्टर हेड, Z.P.CPS, शिरूर ताजबंद,शामरावजी टिकोरे माजी अध्यक्ष- व्ही.व्ही.के. सोसायटी, कुमठा बीके,केशव मुंडकर HM, Z.P.C.P.M., शिरूर ताजबंद, भाजपा तालुका अध्यक्ष प्रताप पाटील,केंद्रीय मुख्याध्यापक केशव मुंडकर ,वा.शि.प्र.मं.सचिव श्री बाबासाहेब हाळीकर आदींची उपस्थिती होती

चिमुकल्यांनी नेत्र दीपक असा नृत्याविष्कार करून उपस्थितांची मने जिंकली असुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम शाळेत वेळोवेळी घेतली जातात. पुस्तकी अभ्यासा सोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, गुणांचे चांगले छंद जोपासुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम पॅराडाईज इंग्लिश स्कूल करत आहे असे मत शाळेच्या मु.अ. शालिनी कुमठेकर यांनी आपले मत प्रास्ताविकातून मांडले
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्हयाचे पालक मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, परिसरातील विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश स्कूलची आवश्यकता लक्षात घेऊन श्रीमती कुमठेकर मॅडम यांनी पॅराडाईज इंग्लिश स्कूलची सुरुवात केली व त्यांना आम्ही वेळोवेळी सहकार्य करू असे आश्वासन दिले व पालकांनी इंग्लिश स्कुल मध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊन वेळोवेळी शाळेला जाऊन भेटी द्याव्यात असे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी अनिल कुलकर्णी , बळीरामजी भिगोले अंकुशरावजी कानवटे, दिनानाथजी राचमाळे,मा.सभापती बालासाहेब पाटील, वामनराव पाटील, महेश बिलापट्टे पत्रकार बांधव व पालक वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
दीपा कुलकर्णी, माया मोठेराव, चांगुना राठोड सुभाष तेलगाने, राजपाल जाधव,भाग्यश्री जाधव, कल्पना आबंदे, मयुरी पाटील,.राजश्री दोडके ,अनिल राजे, ज्ञानेश्वर तोगरे, चंद्रकांत पवार, प्रशांत कांबळे,विशाल देगुरे, पांचाळ आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. मारोती जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर गणपती बर्डे यांनी आभार मानले वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!