साखर कारखान्यांनी ऊस विकासास प्राधान्य दयावे – सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
साखर कारखान्यांनी ऊस विकासास प्राधान्य दयावे - सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : कारखाने आर्थिकदृष्टया सक्षमपणे चालविणेकरीता कमीत कमी १६० दिवस गळीत हंगाम चालणे गरजेचे आहे. परंतु यावर्षी फक्त ९० ते १२५ दिवसच कारखाने चालले आहेत. त्याकरीता कारखान्याने आपल्या ऊस विकासाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त
केले.
ते उजना येथील सिध्दी शुगर अॅड अलाईड इंडस्ट्रीज लि. यासाखर कारखान्याने हंगाम २०२४-२५ चा गळीत हंगामात सांगता समारंभात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव होते. तसेच प्रमुख उपस्थितीत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, व्यवस्थापकिय संचालक अविनाशभैय्या जाधव, व तसेच कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट श्री.पी.जी.होनराव यांचे हस्ते आरती करुन व श्रीफळ चढवुन कार्यक्रम संपन्न झाला.
ते पुढे बोलतांना म्हणाले की, राज्यातील साखर कारखान्याची गाळप क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, परंतु त्या प्रमाणात ऊस उत्पादनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याकरीता कारखान्याची गाळप क्षमता वाढविणेपूर्वी त्या कारखाना कार्यक्षेत्रात तेवढा ऊस उपलब्ध आहे का? याची खात्री करुनच यापुढील काळात विस्तारीकरणासाठी परवानगी दयावी लागेल. त्यासाठी प्रत्येक कारखान्याने आपआपल्या ऊसविकास विभागामार्फत एकरी ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच राज्यातील साखर कारखान्याचे भवितव्य चांगले रहाणार आहे. क्रॉम्प्रेस्ड बायोगॅस, हायड्रोजन, सोलार प्रोजेक्ट कोजनरेशन यामुळे कारखान्यांना चांगले दिवस येणार आहेत.आता माझ्यावर राज्याच्या सहकारमंत्री पदाची जबाबदारी असुन, सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करुन सहकार क्षेत्राला राज्यातच नव्हेतर देशात नावलौकिक मिळवून देण्याचा माझा निर्धार आहे. त्यादृष्टीने मी प्रयत्नशिल असुन मराठवाडा विदर्भ या भागात सहकार क्षेत्राला सक्षम करुन त्याला अधिक गतीमान कसे करता येईल यासाठीही माझे प्रयत्न आहेत. तसेच, अहमदपुर चाकुर तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्नशिल असुन कांही कामांना सुरुवात होवुन गती मिळली आहे. तर कांही कामे प्रगतीपथावर आहेत. तर कांहीना लवकरच मंजुरी मिळणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील युवकांना भविष्यात रोजगार संधी काय आहे हे लक्षात यावे त्यादृष्टीने त्यांना आभ्यासक्रम निवडता यावा यासाठी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा आम्ही लवकरच घेणार आहोत असे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.
सिध्दी शुगर ने ११४ दिवसात ३,८४,१४१.०० मे. टन ऊसाचे गाळप करुन -३,२७,३०० विंचटल साखेचे उत्पादन केले आहे. बी. हेवी मोर्लेसीसचे उत्पादन विचारात घेता साखर उतारा १०.९०% इतका आला आहे.
अरविंद साहेबराव कदम या उभयतांचे हस्ते पुजा करण्यात आली. प्रास्तावीक करतेवेळी कारखान्याचे व्यवस्थापकिय संचालक अविनाश भैय्या जाधव म्हणाले की, यावर्षीचा गळीत हंगाम अतिशय कठीण होता. परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला आहे. माझी ऊस ऊत्पादक शेतक-यांना एकच विनंती आहे की, मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेवुन आगामी काळात ऊस लागवड करतांना ५ फुट सरीवरच ऊसाची लागवड करावी असे अवाहन केले.
यावेळी, व्यासपिठावर निवृत्त कार्यकारी अभियंता साहेबराव जाधव, व्यंकटराव पाटील, व्यवस्थापकिय संचालक अविनाश जाधव, पदमाकरराव पाटील,.टी.एन. कांबळे, अहमदपुर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, प्रदिपदादा सोळंके, यशवंत केंद्रे, शिवाजी खांडेकर, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, अविनाश देशमुख, तानाजी राजे, कैलासगिर महाराज डोंगरगांवकर, मुर्तुजा खान, अमीत रेडडी, बालाजी कातखेडे, रामदास कदम, नागमोडे, चंद्रकांत पाटील, सादीक शेख, विश्वांभर पाटील, प्रशांत भोसले, दयानंद सुरवसे, सोमशेखर चौधरी, सचिन पाटील, बाळासाहेब साखरे, सतीष नवटक्के, तुकाराम पाटील, जनरल मॅनेजर एस.आर. पिसाळ, जनरल मॅनेजर (टेक) बी. के. कावलगुडेकर, जनरल मॅनेजर (केन) पी.एल. मिटकर, जनरल मॅनेजर (डिस्टीलरी) एस. बी. शिंदे, चिफ अकौंटंट एल. आर. पाटील, चिफ फायनांस ऑफिसर, डॉ. आनंद पाटील, ऊसविकास अधिकारी, वाय. आर. टाळे, ऊसपुरवठा अधिकारी, व्ही. के. येदले, डे. चिफ इंजिनिअर ढगे, डे. चिफ इंजिनिअर मुलानी, इन्स्ट्रमेंट मॅनेजर लोखंडे, डे. चिफ केमीस्ट सोमवंशी, आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी / सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी कारखान्याच्या वतीने उपविभागीय सेवानिवृत्त अधिकारी, पाटबंधारे विभाग श्री.व्ही.जी.पाटील, श्री. बंडोपाध्याय, टर्बाइन कन्सलटंट व तसेच सर्वाधिक ऊसपुरवठा शेतकरी, वहातुकदार, वहानधारक, कारखान्यात उत्कृष्ट आणि गुवत्तापुर्वकपुर्वक काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप पाटील व संभाजी चोपणे यांनी केले तर आभार कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी.जी. होनराव यांनी मानले.
