अहमदपूर शहरात शौर्य रक्त पेढीची सुरवात; रूग्णांसाठी रक्ताची सुविधा उपलब्ध

0
अहमदपूर शहरात शौर्य रक्त पेढीची सुरवात; रूग्णांसाठी रक्ताची सुविधा उपलब्ध

अहमदपूर शहरात शौर्य रक्त पेढीची सुरवात; रूग्णांसाठी रक्ताची सुविधा उपलब्ध

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरात जवळपास ७० ते ७५ छोटे मोठे रुग्णालये असुन गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना उपचारासाठी लागणारे रक्त लातुर किंवा नांदेड या जिल्ह्याच्या ठिकाणीच मिळत असल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत होती ही गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील थोडगा रोड वरील रेड्डी कॉम्प्लेक्स येथे बँक ऑक इंडियाच्या वर दुसऱ्या मजल्यावर शौर्य रक्त पेढीची नुकतीच सुरवात करण्यात आली असुन गरजु रूग्णांसाठी रक्ताची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लातुर व नांदेड जिल्ह्याच्या मध्यभागी असलेले अहमदपूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असुन शहराची लोकसंख्या सुमारे ६० हजार एवढी आहे शहरात एकंदरीत ७० ते ७५ छोटे मोठे रुग्णालये आहेत तसेच आजुबाजुच्या जवळपास १०० ते १५० गावातुन बहुसंख्य लोक उपचारासाठी शहरातील रूग्णालयात येत असतात त्यातच एखाद्या गंभीर स्वरूपाच्या रुग्णाला रक्त देण्याची आवश्यकता असल्यास एक तर रूग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना लातुर किंवा नांदेड या जिल्ह्याच्या ठिकाणीच जावे लागत असल्यामुळे रूग्णांची गैरसोय होत होती.

ही गैरसोय लक्षात घेऊन अहमदपूर शहरातील थोडगा रोडवरील रेड्डी कॉम्प्लेक्स येथे बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या मजल्यावर आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलीत शौर्य रक्त पेढीची नुकतीच सुरवात करण्यात आली आहे शहरातील तसेच तालुक्यातील गरजु रूग्णांना या रक्त पेढीची मदत होत असुन तालुक्यातील नागरीकांनी याचे स्वागत केले आहे.

शौर्य रक्त पेढीत रक्त व रक्तघटक WB,PRBC,Pletlet,Plasma इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असुन तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते , विविध सामाजिक संघटना सेवाभावी संस्था यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करून शौर्य रक्त पेढीत रक्त संकलन करावे जेणे करून आपल्याच तालुक्यातील गरजु रूग्णांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल असे आवाहन संचालक डॉ. नयन इंगोले पाटील , डॉ. कृष्णा चाटे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!