स्व.अशोकराव हाके पाटील यांच्या स्मरणार्थ सुखमणी वृद्धाश्रमास ५२,१००/- रुपयाची देणगी
स्व.अशोकराव हाके पाटील यांच्या स्मरणार्थ सुखमणी वृद्धाश्रमास ५२,१००/- रुपयाची देणगी
अहमदपूर (गोविंद काळे) : श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ मांडुरकी,बँक कॉलनी, अहमदपूर चे तत्कालीन संस्थापक सचिव स्वर्गवासी अशोकराव हाके पाटील यांची दिनांक १४ मार्च रोजी पुण्यतिथी साजरी केली जाते.यानिमित्ताने संस्थेच्या वतीने अहमदपूर तालुक्यातील काजळ हिपरगा येथील सुखमणी वृद्धाश्रमास बांधकामासाठी ५२,१००/- रुपयाची देणगी देण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ मांडूरकी च्या वतीने जिल्ह्यात अनेक नामांकित संस्था कार्यान्वित आहेत या संस्थेचे तत्कालीन सचिव स्वर्गवासी अशोकराव पाटील यांची १८ वी पुण्यतिथी दिनांक १४ मार्च रोजी आहे. यानिमित्ताने संबंधित संस्थेअंतर्गत शाळांच्या वतीने काजळ हिप्परगा येथील सुखमणी वृद्धाश्रमाच्या संचालकांना रुपये ५२,१००/- चा धनादेश देण्यात आला.यावेळी संस्थेच्या सचिव प्राचार्य रेखाताई तरडे हाके, कुलदीप हाके, शिवलिका हाके, सम्राट चंद्रगुप्त चे प्राचार्य हरिदास सर, लिनेस क्लबच्या सुनंदा कुलकर्णी,कलावती भातांब्रे मॅडम दैवशाला शिंदे,संत ज्ञानेश्वर प्राथमिकच्या मुअ आशाताई रोडगे,संत ज्ञानेश्वर माध्यमिकच्या मुअ मिनाताई तोवर,संगिता आबंदे,स्वामी विवेकानंद माध्यमिक आश्रमशाळेचे मुअ लक्ष्मण जेलेवाड,कै अशोकराव हाके पाटील पतसंस्थेचे सचिव संतोष मुळे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर, बालाघाट तंत्रनिकेतनचे प्राचार्य कोपनर सर, बालाघाट आयटीआयचे प्राचार्य आरदवाड सर, पनाळे राजकुमार, शेख जिलानी,राजुरे ,गोदाम,सौ डबीर आदीसह उपस्थित होते.
