छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप कडून विपश्यना करून आलेल्यांचा सत्कार
छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप कडून विपश्यना करून आलेल्यांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : आज प्रत्येक माणूस तान तणावाचं जीवन जगत आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या अंगावर प्रचंड कामाचं ओझं पडल्यामुळे ते सुद्धा ताणतणवाचं जीवन जगत आहेत. आजचा माणूस पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागल्यामुळे तो स्वच्छंदी जीवन विसरून गेलेला आहे. या सर्व बाबीवर रामबाण उपाय म्हणजे विपश्यना शिबिरात जाऊन दहा दिवस पंधरा दिवस किंवा वीस दिवस विपश्यना करून ताण तणाव रहित जीवनाला प्रारंभ करणे होय. आणि म्हणून छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री माधव तिगोटे सर, श्री रा सू कांबळे सर श्री पांडुरंग धर्माधिकारी सर यांनी बालाघाट मधील गोंदिया येथील शिबिरामध्ये दहा दिवसाचं विपशना शिबिर पूर्ण करू नुकतेच आले आहेत म्हणून त्यांचा आज दिनांक 12 मार्च 2025 रोजी अहमदपूर येथील योगा मैदानावर सर्वांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले, माधव तिगोटे सर रा सू कांबळे सर आणि पांडुरंग धर्माधिकारी सर यांनी सर्वांना जीवनामधे विपशनाचे महत्त्व काय आहे हे सर्वांना स्व अनुभवातून सांगितले. या सन्मान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी एस वाघमारे यांनी केले तर बालाजी दुकाने यांनी सर्वांचे आभार मानले.
