संत ज्ञानेश्वर विद्यालयात दुर्गुणांची होळी
संत ज्ञानेश्वर विद्यालयात दुर्गुणांची होळी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पारंपारिक होळीचा सण नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्यातील वाईट सवयी, दुर्गुण कागदावर लिहून जाळून टाकून होळीचा सण उत्साहात साजरा केला. नकारात्मकता कमी करून सकारात्मकता जोपासावी असा संदेश दिला. होळी सणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात यामुळे पर्यावरणाची हानी होते. तसेच होळी सण साजरा करताना सामाजिक भान ठेवले जात नाही .पाणी वाया घालवले जाते. केमिकल मिश्रित रंग वापरून शारीरिक इजा पोहोचवली जाते हे होऊ नये म्हणून लहान मुलांवर सुसंस्कार व्हावेत यासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील कचरा, सुकलेला पालापाचोळा गोळा करून त्याची होळी केली. होळी सणाचे पारंपरिक महत्व त्रिगुणा मोरगे यांनी सांगितले.
यावेळी अनुजा माचवे, सरिता मुसणे, शीला तेलंगे ,रूपाली परचंडे विद्या घोटे, मीना होनराव, संघमित्रा तिगोटे, शबाना शेख, अश्विनी घोगरे, शारदा तिरुके, प्राजक्ता भोसले, संजीवनी गुरमे, सविता पाटील, सविता करडे, वैष्णवी शिंगडे, सतीश साबणे, नंदकुमार मद्देवाड ,रोकडोबा कुंडगीर, युवराज मोरे, मीर सय्यद ,मीना तोवर, आयोध्या जाधव ,आशा रोडगे, अर्चना जांभळदरे ,संगीता आबंदे,ज्योती बावगे , ज्ञानेश्वर चव्हाण सह आदींची उपस्थिती होती.
