संचमान्यतेचा शासननिर्णय रद्द करण्यासाठी करणार आंदोलन – अरुण सोळुंके जिल्हाध्यक्ष
लातूर जिल्हापरिषदे समोर प्राथ शिक्षक समितीचे धरणे
निलंगा (प्रतिनिधी) : राज्यातील शाळांमधील शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करणारा व स्वतःच्या गावातील शिक्षण मिळविण्याचा हक्क डावलणारा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती 17 मार्च रोजी संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन करणार आहे. लातूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर दुपारी दोन ते पाच या वेळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 मार्च 2024 शासन निर्णयानुसार 2024- 25 संच मान्यता अंतिम करण्यात आली आहे .शिक्षण कायद्यातील तरतुदीचा 28 ऑगस्ट 2015 (सुधारित 8 जानेवारी 2016) विसंगत अशा शासन निर्णयाने शाळांमध्ये शिक्षकच असणार नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात हजारो शिक्षक अतिरिक्त होतील तथापी शिक्षक उपलब्ध नसल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडचण निर्माण होऊन शाळेत शिक्षक नसल्याने पालकांना आपल्या पाल्यांना परगावच्या शाळेत दाखल करावी लागेल. गोरगरीब वंचित शेतमजुर यांच्या मुलाची शिक्षणाची परवड होईल मुलीच्या शिक्षणामध्ये धोका येण्याची स्थिती आहे .दररोज परगावी जाणे येणे करण्यामुळे गळतीचे प्रमाण वाढेल याबाबत 25 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करावा असे आवाहान केले पण अद्यापही शासन निर्णय रद्द झालेला नाही. स्वतःच्या गावातील शिक्षण मिळवण्याचा हक्क डावलणारा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी तसेच जि प स्तरावरील जि पिएफ रक्कम मिळण्यासाठी दोन ते चार महिन्याचा कालावधी लागतो, शिक्षक पुरस्कार तिन वर्ष वितरीत केले नाहीत,निवडश्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रलंबीत प्रस्ताव निकाली काढावे,1 नोव्हेबर 2005 पुर्वी जाहीरात निघालेल्या शिक्षक बांधवास जुनी पेन्शन लागु करण्याबाबत जि प लातुर शिक्षण विभागाचा चालढकलपणा या मागणीसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती 17 मार्च रोजी राज्यभर धरणे आंदोलन करणार आहे .त्याचप्रमाणे लातूर जिल्हा परिषद समोर 17 मार्च 2025 वार सोमवार रोजी आंदोलन होत आहे. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंके राज्य संपर्क प्रमुख किशनराव बिरादार सरचिटणीस चंद्रकांत भोसले सभाकार्याध्यक्ष भरत पुंड कोषाध्यक्ष विजयकुमार गोरे उपाध्यक्ष रणजीत चौधरी विकास पुरी संजय सुर्यवंशी कुलदीप पाटील व सर्व तालुकाध्यक्ष केले आहे.
