अवैद्य वाळू वाहतुक ;हायवासह २५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
अवैद्य वाळू वाहतुक ;हायवासह २५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
दहा दिवसात अवैद्य वाळू हायवासह ८६ लाखाचा मुद्देमाल जप्त ; प्रशिक्षणार्थी आय.पि. अधिकारी सागर खरडे यांची कामगिरी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील अवैद्य धंद्याना आळा घालण्यासाठी अहमदपूर पोलीसांनी विविध पथकांची निर्मिती करण्यात असुन नांदेड रोडवरील सांगवी फाटा येथे अवैद्य वाळू वाहतुक करणारा हायवा पकडून २५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अहमदपूर पोलीसात दि १२ मार्च रोजी संध्याकाळी ०९: ०० वाजता दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गेल्या दहा दिवसात ४ हायवासह ८६ लाखाचा मुद्देमाल जप्त करून ८ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
याविषयी सविस्तर माहीती, अशी की लातुर जिल्ह्यातील अवैद्य धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर प्रशिक्षणार्थी प्रभारी सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर खरडे अहमदपूर यांनी वेगवेगळ्या पथकाची निर्मिती केली असुन एक पथक रात्रीच्या गस्तीवर असताना गोपीनीय माहीतीच्या आधारे दि १२ मार्च रोजी संध्याकाळी ०७ : ०० वाजता नांदेड लातुर रोडवरील सांगवी फाटा येथे अवैद्य वाळुने भरलेला हायवा टिप्पर चोरटी वाळू वाहतुक करताना पकडण्यात आला आहे
अवैद्य वाळु व हायवा टिप्पर क्र. एम एच ४८ ए.वाय ८९४६ सह एकुण २५ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोकॉ हरीदास सोमनाथ कांबळवाड यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार 1. धोडीराम भाउसाहेब केंद्रे वय 36 वर्षे रा. ब्रम्हवाडी ता. अहमदपूर 2. संतोष केंद्रे रा अहमदपुर यांच्या विरूध्द दि १२ मार्च रोजी संध्याकाळी ०९ : ०० वाजता अहमदपूर पोलीसात गुरन नं १६५/ २०२५ कलम ३०३ ( २), ३ ( ५) BNS सह कलम पर्यावरण अधीनियम कलम १५ नुसार दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तर गेल्या दहा दिवसात आत्तापर्यत ४ हायवासह ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त करून १.अरूण सुधाकर गुट्टे वय ३३ वर्ष रा हनुमान टेकडी अहमदपूर, २. संतोष सतिष शेळके रा कोकणगा ३. माधव ज्ञानोबा होळकर वय ३२ वर्ष रा शेंद्री सुनेगाव ४. सखाराम बाजगीर रा लेक्चर कॉलनी अहमदपूर ५. चक्रधर दिलीप बुधवारे वय ३१ रा कोळवाडी ६. विजय पाटील रा परचंडा सर्व आरोपी ता अहमदपूर जि लातुर आदीसह ८ जणांवर विविध कलमानुसार अहमदपूर पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
प्रभारी प्रक्षिक्षणार्थी सहा पोलीस अधिक्षक सागर खरडे यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत असुन अवैद्य धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत अवैद्य धंद्याना लगाम घालण्यासाठी नागरीकांनी मो.नं ९७६२१६८७८० वर संपर्क करण्याचे आवाहन आय.पि.एस खरडे यांनी केले आहे.
