निडेबन येथे श्रीमद् भागवत कथा व कीर्तन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन

0
निडेबन येथे श्रीमद् भागवत कथा व कीर्तन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन

निडेबन येथे श्रीमद् भागवत कथा व कीर्तन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : शहरापासून जवळच असलेल्या शेल्हाळ रोड निडेबन ता. उदगीर येथे दिनांक 27- 3-2025 ते 2 एप्रिल 2025 या कालावधीत श्रीमद् भागवत कथा व किर्तन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या भागवत कथेचे व्यासपीठ व कथाकार म्हणून हरीभक्त पारायण साध्वी सोनाली दीदी करपे यांच्या सुश्राव्य वाणीने सुरुवात होणार असून कथेची वेळ आहे दुपारी 3 ते 6 या वेळेत कथा संपन्न होणार आहे. कथेचे स्थळ – राधानगरी विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोर राजर्षी शाहू विद्यालयाजवळ शेल्हाळ रोड निडेबन. तसेच दिनांक 1 -4 -2025 वेळ रात्री 8:00 ते 10:00 हरिभक्त पारायण संगीताताई व्यवहारे यांचा कीर्तन सोहळा,दिनांक 2- 4 -2025 सकाळी 9:00 ते 11:00 या वेळेत हरिभक्त पारायण सद्गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे कीर्तन व याच दिवशी हरिभक्त पारायण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांचे सायंकाळी 8:00 ते 10:00 किर्तन सोहळा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या भागवत कथेचा व किर्तन सोहळा कार्यक्रमाचा लाभ उदगीर, जळकोट, देवणी व सीमा भागातील भाविक -भक्तांनी घ्यावा, असे आवाहन निडेबन गावचे माजी उपसरपंच उमाकांत तपशाळे व समस्त ग्रामस्थ निडेबन ता. उदगीर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!