उदयगिरीच्या शुभम शिगवण व संकेत सुपेकर यांची आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

0
उदयगिरीच्या शुभम शिगवण व संकेत सुपेकर यांची आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

उदयगिरीच्या शुभम शिगवण व संकेत सुपेकर यांची आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे खेळाडू शुभम शिगवण आणि संकेत सुपेकर यांनी आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून महाविद्यालयासह उदगीरच्या क्रीडा क्षेत्राचा सन्मान उंचावला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या खो-खो संघात त्यांची निवड झाली होती. त्यांनी विक्रांत विद्यापीठ, ग्वालियर (मध्यप्रदेश) येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत प्रतिनिधित्व करत अप्रतिम खेळ प्रदर्शन केले, आणि सुवर्णपदक मिळवले. त्यांच्या या यशामुळे आता नांदेड विद्यापीठाचा संघ मेंगलोर युनिव्हर्सिटी, कर्नाटक येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत खेळणार आहे.
या उल्लेखनीय यशामागे क्रीडा संचालक प्रा.सतिश मुंढे आणि प्रा. रोहन एनाडले यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अ‍ॅड. एस. टी. पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!