धर्मद्वेषी क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून त्वरित हटवा
धर्मद्वेषी क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून त्वरित हटवा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यावतीने दिनांक 17 मार्च 2025 रोजी तहसील कार्यालय तथा उपजिल्हाधिकार्यालय येथे असंख्य स्वयंसेवकासोबत महाराष्ट्र शासनास निवेदन सादर करण्यात आले.
सदरील निवेदनात औरंगजेबाने आपल्या हयातीमध्ये स्वतःच्या साम्राज्यासाठी आपल्या कुटुंबातील भाऊ दारासिको तसेच वडील शहाजान यांच्यासोबत तसेच तसेच हिंदू शीख धर्मगुरू गुरुगोविंद सिंगजी महाराज यांच्या मुलांसोबत जे क्रूरकृत्य केले, अशा क्रूरकर्मी औरंगजेबाच्या सोबत अख्खी हयात हिंदू वैभव छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी युद्ध केले. तसेच छत्रपती शिवरायानंतर याच औरंगजेबाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सळो की पळो करून सोडले असताना धोक्याने पकडून 39 दिवस त्यांच्या शरीराचे हाल हाल करून त्यांचे हत्या केली अशा निर्दयी आक्रमणकारी क्रूरकरम्या औरंगजेबाची समाधीचे उदत्तीकरण या महाराष्ट्रात सुरू आहे. त्यासाठी अशा आक्रमणकारी औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रातून उखडून टाकावी, अन्यथा बजरंग दल रस्त्यावर उतरून पुन्हा कार सेवा करून ती कबर उखडून टाकेल असे एक निवेदन सादर करण्यात आले.
या प्रसंगी असंख्य विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्ते, स्वयंसेवक, धर्मगुरू उपस्थित होते.
