खरीपहंगाम २०२४ मध्ये शेती पिकाच्या नुकसानीसाठी ई-केवायसी२५ मार्चपर्यंत करुन घ्यावी
खरीपहंगाम २०२४ मध्ये शेती पिकाच्या नुकसानीसाठी ई-केवायसी२५ मार्चपर्यंत करुन घ्यावी
अहमदपूर (गोविंद काळे) : खरीप हंगाम २०२४ मध्ये माहे जून ते आक्टोबर २०२४या कालावधीत लातूर जिल्हयात अतिवृष्टीने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितशेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून ४६६ कोटी ४० लाख इतका निधी मंजूर करण्यात आलाआहे. हा निधी वाटपाची कार्यवाही डीबीटी प्रणालीमार्फत सुरु आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील३ लाख ८६ हजार ५०५ लाभार्थी मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले असून त्यापैकी ३ लाख ५० हजार३७३ लाभार्थ्यांना ३८७ कोटी ३४ लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच २४ हजार३८२ शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी न केल्याने रक्कम २१ कोटी ७७ लाख रुपये इतका निधीवितरीत करणे शिल्लक आहे.लातूर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामार्फतई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतक-यांची गावनिहाय यादी संबंधित गावच्या ग्रामपंचायतीचेठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच याबाबत दवंडी व वर्तमानपत्रात प्रसिद्धी देऊनशेतकऱ्यांना ईकेवायसी पूर्ण करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनीअद्याप ई-केवायसी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसील कार्यालय किंवा ग्राममहसूल अधिकारी यांचेकडे संपर्क साधून व्हीके नंबर प्राप्त करुन घेऊन नजीकचे आपले सरकारसेवा केंद्र किंवा नागरी सुविधा केंद्र (सीएससी) येथे जाऊन ई-केवायसी २५ मार्च २०२५पूर्वी पूर्ण करुन घ्यावी. संबंधित शेतकरी यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच शासनाकडूनडीबीटीपर्यंत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमाहोणार आहे.तरी जे शेतकरी मदतीसाठी पात्र आहेत वअद्याप पर्यंत ई-केवायसी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी मुदतीत ई-केवायसी करुन घेण्याचेआवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामाफत करण्यात येत आहे.
