दारू बंदी साठी उजना येथील वयोवृद्धाचे अनोखे लोटांगण आंदोलन

0
दारू बंदी साठी उजना येथील वयोवृद्धाचे अनोखे लोटांगण आंदोलन

दारू बंदी साठी उजना येथील वयोवृद्धाचे अनोखे लोटांगण आंदोलन

शहरातील रस्त्यासह महापुरूषांच्या पुतळ्या भोवती केले लोटांगण आंदोलन

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील उजना येथील वयोवृध्द ६० वर्षीय एका इसमाने गावात अवैद्य विक्रि होत दारू बंद करावी व संपूर्ण गावात दारूबंदी करावी या मागणीसाठी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून विविध प्रकारचे आंदोलने करून निवेदने देऊन सुद्धा उजना गावात दारु बंदी होत नसल्याने प्रशासनाच्या निषेर्धात शहरातील प्रत्येक महापुरुषांच्या पुतळ्याला व रस्त्यावर लोटांगण घालुन अनोखे आंदोलन करून निषेध नोंदवुन तहसील कार्यालयात दारू बंदी साठी निवेदन दिले.

याविषयी सविस्तर माहीती अशी बलभीम नामदेवराव कासले रा उजना ता अहमदपूर येथील रहीवाशी असुन ते गेल्या ७ ते ८ वर्षापासुन आपल्या पत्नीला सोबत घेऊन उजना गावात कायम स्वरूपी अवैद्य देशी दारु बंद करून प्रशासनाने कोणालाही बिअर बारचा परवाना देऊ नये यासाठी लढा देत आहेत काही वर्षांपुर्वी तेव्हाचे तत्कालीन संरपंच व ग्रामस्थ तसेच महीला मंडळ यांच्या सहकार्याने दारू बंदी साठी वेळोवेळी आंदोलने करून पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क प्रशासन तसेच तहसील प्रशासन यांना निवेदने दिली होती त्यामुळे काही अंशी का हाईना उजना गावात अवैद्य दारू विक्रिला आळा बसला होता
परंतु मागील दोन महिन्यांपासुन पुन्हा आर्थिक व्यवहारातुन अवैद्य दारू विक्रि करणाऱ्यांनी डोके वर काढले आहे त्यातच काही दिवसापुर्वी ग्रामपंचायत कार्यालय उपविभागीय पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन किनगाव , राज्य उत्पादन शुल्क यांच्या सहकार्याने एका मोठ्या आर्थिक व्यवहारातुन नव्यानेच एका बिअर बारला नियम बाह्य मंजुरी दिल्याचे बलभीम नामदेवराव कासले या ६० वर्षीय वयोवृद्ध यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध करून पत्रक वाटले.
तसेच अहमदपूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक, स्वात्रंत्र्यवीर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसवेश्वर चौक, मेन रोड, आझाद चौक, हनुमान मंदिर, हिना लॉज, उपविभागीय पोलीस कार्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरून रस्त्यावरून तसेच शहरातील प्रत्येक महापुरूषाच्या पुतळ्याला अकरा फेऱ्या जमिनिवर लोटांगण घालुन तहसिल कार्यालयात निवेदन दिले असुन या अनोख्या आंदोलनाची दिवसभर चर्चा शहरात चालु होती
४० अंश सेल्सीअस तापमानात एका ६० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला युवा वर्ग व्यसनाधिनतेपासुन दुर रहावा म्हणुन न्यायाच्या अपेक्षेने जनतेच्या न्यायालयात लोटांगण आंदोलन करावे लागले तरी संबंधीत प्रशासन गांभीर्य दाखवत नसल्याची चर्चा शहरात दिवसभर चालु होती. दारू बंदी साठी एका वयोवृद्धाला अशा प्रकारे आंदोलन करण्याची वेळ येते याची संबंधीत प्रशासनाला लाज वाटली पाहीजे अशी प्रतिक्रिया अनेक नागरीकांनी आंदोलना वेळी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!