पिम्मी एजंट लूटमार प्रकरणी तीन आरोपींना प्रत्येकी 7 वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा व 30,000/- रू दंड

0
पिम्मी एजंट लूटमार प्रकरणी तीन आरोपींना प्रत्येकी 7 वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा व 30,000/- रू दंड

पिम्मी एजंट लूटमार प्रकरणी तीन आरोपींना प्रत्येकी 7 वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा व 30,000/- रू दंड

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील टेंभुर्णी रोडवर इ.सन 2023 मध्ये रात्री 11.30 वाजता एक पिग्मी एजंट बँकेची पिग्मीची जमा केलेली रक्कम घराकडे घेऊन जात असताना तीन आरोपींनी मोटार सायकलवर येऊन पैश्याची बॅग हिसकावून घेऊन कोयत्याने एजंटच्या शरीरावर गंभीर वार करून पसार झाले होते त्या प्रकरणात अहमदपूर पोलीसात गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती सदरील प्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावनी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधिश- अहमदपूर यांनी तीन आरोपींना कलम 397 भा.द.वी. नुसार 7 वर्षे सक्त मजूरी 30,000 रु. दंडाची शिक्षा ठोठावली असुन कलम 201 भा.द.वी. नुसार 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच 10,000/- रू दंडाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे.

याविषयी गुन्ह्याची थोडक्यात माहिती अशी की, आरोपी क्र.1. शुभम प्रकाश जाधव वय 19 वर्षे आरोपी क्र. 2. वसंत शिवाजी वाडीकर वय 21 वर्षे क्र. 3. जहीर ईस्माईल शेख वय 18 वर्षे यांनी दि. 07/10/2023 रोजी रात्री 11:30 वाजताचे सुमारास फिर्यादी अच्युत अशोक शेळके रा. तळेगाव ता. अहमदपूर हे बैंकेची पिग्मीची रक्कम घेवून टेंभूर्णी रोडने संत ज्ञानेश्वर नगर मधील घराकडे जात असताना वरील तीनही आरोपीने मोटार सायकलवर पाठलाग करून पाठीमागून येवून फिर्यादी अच्युत शेळके यांना रस्त्यावर अडवले व फिर्यादी शेळके यांच्या गळ्यात अडकवलेली पिग्मी गोळा करून आणलेली रक्कमेची बैंग हिसकवण्याचा ते प्रयत्न करू लागले फिर्यादी अच्युत शेळके यांनी त्यांना प्रतिकार केला असता वरील आरोपींनी कोयत्याने हातावर तोंडावर गंभीर घाव घालून फिर्यादीस जखमी केले.

आरोपी आणि फिर्यादीच्या झटापटीमध्ये पिग्मीची रक्कम ठेवली असलेल्या बैंग मधील एक लाख रूपये घेवून वरील तीनही आरोपी मोटार सायकलवरून घटनास्थळावरून पळून गेले होते फिर्यादी अच्युत शेळके यांनी आरडा ओरडा केल्याने तेथे बरेच लोक जमा झाले होते त्यातील काही जणांनी पोलीसांना फोन करून बोलावुन घेतले व जखमी फिर्यादी अच्युत शेळके यांना उपचारासाठी खाजगी दवाखाण्यात दाखल केले. जखमी फिर्यादी अच्युत शेळके यांच्या जबाबा वरून अहमदपूर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली होती. अहमदपूर पोलीसांनी तात्काळ तपासाचे चक्र फिरवून आरोपींचा शोध घेवून तीनही आरोपींना ताब्यात घेवून अहमदपूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 577 / 2023 कलम 397,394,201 सह कलम 34 भा.द.वी. नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.

वरील सर्व तीनही आरोपी विरूध्द गुन्हा कलम 397,394,201 सह कलम 34 भा.द.वी कायदान्वये नोंद करुन तपासिक अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.पी. सुर्यवंशी यांनी योग्यरित्या तपास करुन अहमदपूर न्यायालयात वरील कलमान्वये दोषारोपपत्र दाखल केले होते ज्याचा सत्र खटला क्र. 16/2024 महाराष्ट्र शासन वि. शुभम व इतर असा होता.

सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 08 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये फिर्यादी, वैदयकीय अधिकारी व तपासिक अधिकारी व्ही.पी. सुर्यवंशी व बालाजी पुट्टेवाड पोकॉ. यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. जिल्हा व सत्र न्यायाधिश अहमदपूर मा .सुरेंद्र वडगावकर यांनी प्रकरणाच्या सुनावणी अंती सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेला पुरावा ग्राहय धरुन वरील तीनही आरोपींना कलम 397 भा.द.वी. नुसार 7 वर्षे सक्त मजूरी तसेच 30,000रु. दंडाची शिक्षा ठोठावली. त्याचप्रमाणे कलम 201 भा.द.वी. नुसार 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व 10,000/- दंडाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे.

या खटल्यामध्ये सरकार तर्फे सहाय्यक सरकारी वकील महेश पाटील, यांनी काम पाहीले महेश पाटील यांना जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांचे मोलाचे मागदर्शन लाभले असुन पोलीस पैरवीकार पोलीस हेडकॉन्स्टेबल गोविंद आर. पवार बक्कल नं. 1128 व पो.कॉ. राजगीरवाड यांनी मोलाचे सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!