बालाजी संभाजी केंद्रे यांची पोलीस उप-निरीक्षक पदी पदोन्नती
बालाजी संभाजी केंद्रे यांची पोलीस उप-निरीक्षक पदी पदोन्नती
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर पोलीस स्टेशन येथे मागील तीन वर्षापासुन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेले बालाजी संभाजी केंद्रे रा माळाकोळी ता लोहा यांची नुकतीच पोलीस उप-निरीक्षक पदी पदोन्नती झाली असुन दि ७ मार्च रोजी लातुर येथे पोलीस मुख्यालयात पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते पदोन्नतीचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, बालाजी संभाजी केंद्रे रा माळाकोळी ता लोहा येथील रहिवाशी असुन ते अहमदपूर पोलीस स्टेशन येथे मागील तीन वर्षापासुन सहा. पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत होते त्यांनी पोलीस प्रशासनात लातुर जिल्ह्यातील पोलीस मुख्यालय, अहमदपूर पोलीस स्टेशन, गांधी चौक पोलीस स्टेशन लातुर,किनगाव पोलीस स्टेशन , चाकुर पोलीस स्टेशन, वाढवणा पोलीस स्टेशन आदी विविध ठिकाणी पोकॉ,पोना,पोहेकॉ या पदावर तब्बल ३५ वर्ष उत्कृष्ट सेवाकार्य केले आहे या काळात त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आता बालाजी केंद्रे यांची अहमदपूर पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरिक्ष पदी पदोन्नती झाली असुन त्यांना दि ७ मार्च रोजी लातुर येथील पोलीस मुख्यालयात पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते पदोन्नतीचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे त्यांनी दि १० मार्च रोजी आपला पदभार स्विकारला केंद्रे यांना आई मंजुळा केंद्रे, पत्नी रंजना केंद्रे, मुलगा लक्ष्मीकांत केंद्रे (एम.बी.बी.एस) व एक विवाहीत मुलगी प्रियंका मुंढे असा परिवार आहे.
या पदोन्नती बद्दल पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर, पोलीस निरिक्षक बि. डि बुसनुर, प्रभारी प्रशिक्षणार्थी पोलीस निरिक्षक आय.पि.एस सागर खर्डे,सहा पोलीस निरिक्षक के.एस पठान, अलिवराज पोलीस उपनिरिक्षक रवि बुरकुले, आनंद श्रीमंगल, स्मिता जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दिंडगे, चिमनदरे, सुरकुटे, बेल्लाळे पोहेकॉ कैलास चौधरी, तानाजी आरदवाड, हनुमंत आरदवाड, साळवे, सुकेश केंद्रे, सारोळे, कांबळवाड, गाडे, मामडगे, विशाल मुंडे, बबन चपडे, सुमित्रा केंद्रे , राजगीरवाड, कज्जेवाड, चोले, जायभाये, आदी पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी अभिनंदन केले असुन पोलीस स्टेशन अहमदपूरच्या वतीने बालाजी केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला.
