महाबीजतर्फे स्व. रामचंद्रराव पाटील संघाचा विशेष सन्मान, भरत चामले यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल

0
महाबीजतर्फे स्व. रामचंद्रराव पाटील संघाचा विशेष सन्मान, भरत चामले यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांच्यावतीने आयोजित “स्टार डीलर्स मीटिंग” मध्ये परभणी विभागातून सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित उदगीर या संस्थेचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन भरत तुकाराम चामले यांचा महाबळेश्वर येथे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक आय ए एस योगेश कुंभेजकर आणि संचालक वल्लभराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेत तालुका खरेदी विक्री संघास स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर तालुका खरेदी विक्री संघ असे नाव मंजूर करून आणण्यात भरत चामले यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून भरत चामले ओळखले जातात. भरत चामले यांची शेतकऱ्या बद्दलची सहानुभूतीपूर्वक वागणूक आणि शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याची तळमळ विचारात घेऊन यापूर्वीही अजित दादा पवार यांनी भरत चामले यांना महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या संचालक पदी मराठवाड्यातून बिनविरोध निवडून आणले होते. सध्या त्यांच्या या सकारात्मक कार्याची दखल घेत पक्षाने प्रदेशात कार्यकारणीवर संघटक सचिव म्हणून काम करण्याची संधीही दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करताना खरेदी विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याच्या धान्याला योग्य भाव तर मिळालाच पाहिजे, तसेच कडते आणि सॅम्पल च्या नावाखाली होणारी शेतकऱ्यांची लूट ही भरत चामले यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळल्यानंतर लगेच बंद केली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. सहकार आणि कृषी क्षेत्रात विश्वासहार्यता संपादन करणे अत्यंत महत्त्वाचे असते, आणि हीच महत्त्वाची जबाबदारी चेअरमन म्हणून भरत तुकाराम चामले यांनी यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवली. विश्वास संपादन केल्यामुळे या खरेदी विक्री संघाची उलाढाल ही वाढली आणि त्याची दखल घेत महाबीज या मोठ्या कंपनीने खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले यांचा सत्कार केला. ही बाब उदगीरकरांसाठी कौतुकाची आणि अभिनंदनिय ही आहे. परभणी विभागात प्रथम क्रमांकपरभणी विभागामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागातील सर्व सहकारी संस्थां मधून सर्वाधिक उलाढाल करीत स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी-विक्री संघाने प्रथम क्रमांक मिळवला. या यशस्वी कामगिरीमुळे संस्थेचा महाबीजतर्फे गौरव करण्यात आला.संस्था वर्षानुवर्षे शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट सेवा प्रदान करत असून बियाणे, खते, कीटकनाशके तसेच कृषी साहित्याच्या वितरणामध्ये आघाडीवर आहे. उच्च प्रतीची उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा यामुळे संस्थेने अल्पावधीतच मोठी उलाढाल साध्य केली आहे.महाबळेश्वर येथे झालेल्या या विशेष सोहळ्यास महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक आय ए एस योगेशजी कुंभेजकर, संचालक वल्लभराव देशमुख तसेच अनेक नामवंत उद्योगपती, कृषी तज्ज्ञ आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे चेअरमन भरत तुकाराम चामले यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्थेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. शेतकऱ्यांशी प्रामाणिक नाते जोडून त्यांना गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादने आणि सेवा पुरवण्याचा संस्थेचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.मतदार शेतकऱ्यांनी आणि संचालक मंडळाच्या विश्वासामुळे हे कार्य शक्य – भरत चामलेया सन्मानानंतर चेअरमन भरत तुकाराम चामले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले,”उदगीर तालुक्यातील सुज्ञ मतदारांनी आणि माझ्या सहकारी संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास दाखवून वेळोवेळी कठोर आणि शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचे मान्य केले. हा मी माझ्यासाठी सन्मान समजतो. सहकाऱ्यांच्या या भूमिकेमुळेच शेतकऱ्यांची सेवा हेच आमचे ध्येय आहे. त्यांच्या विश्वासामुळेच आम्ही हा यशाचा टप्पा गाठू शकलो. भविष्यातही आम्ही शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट सेवा देण्याचा संकल्प करत आहोत. मला पक्षश्रेष्ठींनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी काम करण्याची संधी दिली, मी फक्त चेहरा आहे खऱ्या अर्थाने हे काम उदगीर, देवणी, जळकोट तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्व सहकाऱ्यांचे आणि मतदारांचे, नेत्यांचे श्रेय आहे.

महाबीजतर्फे स्व. रामचंद्रराव पाटील संघाचा विशेष सन्मान, भरत चामले यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल

असेही भरत चामले यांनी स्पष्ट केले आहे. इतर संस्थांना प्रेरणा देणारे आणि आदर्श कार्य करणारा खरेदी विक्री संघ !महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक आय ए एस योगेश कुंभेजकर यांनीही संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत सांगितले की, “शेतकऱ्यांपर्यंत योग्य बियाणे आणि कृषी उत्पादने पोहोचवण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी संघाने केलेले काम प्रेरणादायी आहे. तसेच ते इतरांसाठी आदर्श घेण्यासारखे आहे. स्वर्गीय रामचंद्र पाटील खरेदी विक्री संघास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छासंस्थेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सहकार क्षेत्रातून आणि कृषी उद्योग क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे. भविष्यातही ही संस्था शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर राहील, असा विश्वास महाराष्ट्रातून व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळेच स्वर्गीय रामचंद्र पाटील तालुका खरेदी विक्री संघास महाराष्ट्रातील सहकार आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!