माझ्या मामाची लाडकी पिंगा नाचते चिंग चिंग चिंगा !’

0
माझ्या मामाची लाडकी पिंगा नाचते चिंग चिंग चिंगा !'

माझ्या मामाची लाडकी पिंगा नाचते चिंग चिंग चिंगा !'

कवी संजय खाडे यांच्या बहुविध कव्यगायनाने महात्मा फुले महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात रंग भरला

अहमदपूर (गोविंद काळे) : ‘ माझ्या मामाची लाडकी पिंगा कानी घालून मोत्याच्या रिंगा, दारी वाजते डीजेचं गाणं, तवा नाचते चिंग चिंग चिंगा..!’ या कवी संजय खाडप यांच्या बहुविध कव्यगायनाने महात्मा फुले महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात रंग भरून नवचैतन्य निर्माण झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून घाटनांदुर जि. बीड येथील वसुंधरा महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख तथा सुप्रसिद्ध कवी डॉ. संजय खाडप उपस्थित होते. तर किसानपिठावर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, स्नेहसंमेलनाचे प्रभारी प्राध्यापक डॉ. सतीश ससाणे, विद्यार्थी प्रतिनिधी कु. नेहा कुरील यांची उपस्थिती होती.
यावेळी कवी संजय खाडप यांनी कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. ‘ डिस्को अंगात घालून शर्ट कसं मोकाट फिरतंय कार्ट’, ‘ दंगलीने जंगलात गाठलं, माणसानं कसं माणसाला लुटलं’, ‘ माझ्या बापाचा शिवार, वर कर्जाचा डोंगर, डोंगर माथ्यावर फणा काढून कसा बसला सावकार’ अशा एक से बढकर एक रचना सादर करत विद्यार्थ्यांची मने जिंकली. शिक्षणाशिवाय कोणताही तरणोपाय नसून आपल्या विकासाचा एकमेव मार्ग शिक्षणच असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या विविध गुणांची मुक्त उधळण असते. गुणवत्तेबरोबरच आपल्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कला गुण जोपासावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहसंमेलनाचे प्रभारी प्राध्यापक डॉ.सतीश ससाणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी करून दिला. सूत्रसंचालन ह. भ. प.डाॅ. अनिल महाराज मुंढे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!