महात्मा फुले महाविद्यालयात शहिदांना अभिवादन
महात्मा फुले महाविद्यालयात शहिदांना अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी सरदार भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या शहीद दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बी.के. मोरे हे होते. यावेळी सरदार भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
