अहमदपूर पोलिस ठाण्यात गुटखा विक्रेत्यावर गुन्हा दाखल ;आय. पि.एस सागर खर्डे यांची कामगीरी

0
अहमदपूर पोलिस ठाण्यात गुटखा विक्रेत्यावर गुन्हा दाखल ;आय. पि.एस सागर खर्डे यांची कामगीरी

अहमदपूर पोलिस ठाण्यात गुटखा विक्रेत्यावर गुन्हा दाखल ;आय. पि.एस सागर खर्डे यांची कामगीरी

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील भाजी मार्केट परिसरात दि. १९ मार्च रोजी रात्री ८:१५ च्या सुमारास महाराष्ट्र शासनाच्या प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या एका इसमास अहमदपूर पोलिसांनी छापा टाकून २४ हजार ९६६ रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याविषयी पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिकृत माहिती अशी की, आय.पि.एस अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य धंद्याना आळा घालण्यासाठी विविध पथकाची निर्मिती करण्यात आली आहे मुजीब महबूब काजी वय ५० वर्षे रा. दस्तगीर गल्ली अहमदपूर हा शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करत असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून पोलिसात मिळाली त्यावरून त्यांनी दि. १९ मार्च रोजी रात्री ८:१५ च्या सुमारास अचानक छापा टाकला. यात पोलिसांना राजनिवास कंपनीचे ५५ पुढे ज्याची अंदाजे किंमत १० हजार ७५२ रु., जाफराणी जर्दा ६३ पुढे किंमत ३ हजार २४ रु., एक्सपर्ट नंबर १ या प्रतिबंधित गुटक्याच्या ७० पुढे किंमत १ हजार १९० रुपये तसेच सॅमसंग कंपनीच्या निळ्या रंगाचा जुना मोबाईल अंदाजे किंमत १० हजार रुपये असा एकत्रीत २४ हजार ९६६ रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करुन ताब्यात घेतला आहे.
याप्रकरणी अहमदपूर पोलिसात गंगाधर व्यंकट चपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुजीब काजी याच्या विरोधात गु.र.नं. १९०/२५ कलम १२३, २२३,२७४,२७५ भारतीय न्याय संहिता सहकलम ५९ अन्नसुरक्षा अधिनियम २००६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर खरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका येमले करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!