अवैद्य वाळू वाहतुक ; २ हायवा जेसीबीसह ५६ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त आय.पि. एस अधिकारी सागर खर्डे यांची कामगिरी
अवैद्य वाळू वाहतुक ; २ हायवा जेसीबीसह ५६ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त आय.पि. एस अधिकारी सागर खर्डे यांची कामगिरी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील अवैद्य धंद्याना आळा घालण्यासाठी अहमदपूर पोलीसांनी विविध पथकांची निर्मिती केली असुन नांदेड रोडवरील राळगा शिवारात एक अवैद्य वाळू वाहतुक करणारा हायवा एक जेसीबी मोघा गावाजवळ वाळू सहित एक हायवा असे एकूण २ हायवा १ जेसीबी पकडून ५६ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन अहमदपूर पोलीसात दि २० मार्च रोजी विविध कलमान्वये चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याविषयी सविस्तर माहीती, अशी की लातुर जिल्ह्यातील अवैद्य धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर प्रशिक्षणार्थी प्रभारी सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर खर्डे अहमदपूर यांनी वेगवेगळ्या पथकाची निर्मिती केली असुन एक पथक गस्तीवर असताना गोपीनीय माहीतीच्या आधारे दि २० मार्च रोजी सकाळी ०६ : ०० वाजता लातुर – नांदेड रोडवरील राळगा शिवार साई हॉटेल जवळ अवैद्य वाळुने भरलेला १ हायवा टिप्पर सह १ जेसीबी तर मोघा गावाजवळ १ हायवा चोरटी वाळू वाहतुक करताना पकडण्यात आला आहे
अवैद्य वाळु व हायवा टिप्पर क्र. १ . एम एच ०४ एफ.पि ४o११ जेसीबी क्र एम.एच ४० सि.एच २४५१ असा एकुण ३१ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरील मुद्देमाल जप्त केल्यानंतर अवघ्या दिड तासातच मोघा ता अहमदपूर गावाजवळ वाळूने भरलेले हायवा क्र एम.एच १२ एच.डि ७८८२ सहीत २५ लाख २५ हजार रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला
सदरील दोन्ही प्रकरणात ५६ लाख ४५ हजार रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
पोकॉ गंगाधर व्यंकट चपडे, तानाजी व्यंकट आरदवाड यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार 1. चक्रधर दिलीप बुधवारे रा कोळवाडी ता अहमदपूर , २. मनोज बालाजी आईलवाड रा कोळवाडी ता अहमदपूर,३. विजय पाटील रा परचंडा ता अहमदपूर , ४. अंकुश गुलाब राठोड रा. केसुतांडा ता लोहा यांच्या विरूध्द दि २० मार्च रोजी दुपारी अहमदपूर पोलीसात गुरन नं १९२, १९३/ २०२५ कलम ३०३ ( २), ३ ( ५) BNS सह कलम पर्यावरण अधीनियम कलम १५ नुसार चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
