जलसंवर्धन काळाची गरज माजीमंत्री बाळासाहेब जाधव

0
जलसंवर्धन काळाची गरज माजीमंत्री बाळासाहेब जाधव

जलसंवर्धन काळाची गरज माजीमंत्री बाळासाहेब जाधव

अहमदपुर (गोविंद काळे) : जलसंवर्धन ही काळाची गरज असुन, जल है तो कल है असे सांगतांना पारंपारिक पध्दतीने शेतीला पाणी देण्याऐवजी शेतक-यांनी कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करुन पाण्याचे योग्य नियोजन करावे असा कानमंत्र कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजीमंत्री श्री. बाळासाहेब जाधव यांनी दिला.

दिनांक २०/०३/२०२५ रोजी जलसंपदा विभाग व सिध्दी शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात दि.१६ मार्च ते २२ मार्च २०२७ या दरम्यान चालु असलेल्या जलजागृती सप्ताहाचे औचुत्य साधुन सिध्दी शुगर कारखान्यावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते शेतक-यांना पाण्याचे महत्व सांगताना पुढे म्हणाले की, पारंपारिक पध्दतीने एक एकर क्षेत्र भिजविण्यासाठी जे पाणी लागते तेवढ्याच पाण्यात दुप्पट क्षेत्र ठिबक सिंचनाने भिनु शकते. पारंपारिक पध्दतीने पाण्याचा अमाप वापर केल्यामुळे उत्पादनात घट येते. शिवाय शेत जमीनी चोपन व क्षारपाड होण्याचा धोका निर्माण होतो. त्याकरीता ठिबक सिंचन पध्दतीने पाणी वापर केल्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ तर होतेच, शिवाय जमीनीचे आरोग्य व उत्पादकता वाढते असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी उजना, गंगाहिप्परगा, वैवडेवाडी, सुमठाणा, राळगा, सांगवी आदी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जलसंपदा विभागांचे कार्यकारी अभियंता श्री. काळेसाहेब यांनी शेतक-यांना पाणी जपुन वापरल्यामुळे भविष्यात येणा-या अडचणीवर मात करणे शक्य होणार आहे. यासाठी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेवुन स्वतःच्या शेतीमध्ये शेततळे, विहीरी खोदुन कॅनलच्या पाण्याचे आपआपल्या शेतीमध्ये साठवण्याचे नियोजन करुन पाण्याचा योग्य वापर करावा, जेणेकरुन आपल्या शेतीमध्ये एकरी उत्पादनामध्ये वाढ होईल असा मोलाचा सल्ला दिला.

या मेळाव्यास कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग, लातूर श्री. काळेसाहेब, उपविभागीय अधिकारी, जलसंपदा विभाग, अहमदपुर, श्री. वाय.एन. पवार, सहाय्यक अभियंता, अहमदपुर श्री.ओ.डी. पवार, कनिष्ठ अभियंता, श्री. के. पी. वेबडे, कनिष्ठ अभियंता, एस. व्ही. शिंदे, कनिष्ठ अभियंता, कटकमवार, व तसेच सिध्दी शुगर कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट श्री.पी. जी. होनराव साहेव, जनरल मॅनेजर एस.आर. पिसाळ, जनरल मॅनेजर (केन) पी. एल. मिटकर, जनरल मॅनेजर (डिस्टीलरी) एस.बी.शिंदे, चिफ फायनांस ऑफिसर आनंद पाटील, चिफ अकौंटंट एल. आर. पाटील, ऊसविकास अधिकारी वाय.आर.टाळे, ऊसपुरवठा अधिकारी व्ही. के. एदले, दुध्दसंकलन अधिकारी संदीप पाटील हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट श्री.पी.जी.होनराव साहेब यांनी केले तर आभार जनरल मैनेजर (केन) पी.एल. मिटकर यांनी मानले. सुत्रसंचलन कपील लव्हराळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी परचेस ऑफिसर धनराज चव्हाण, हरिभाऊ पांचाळ, पदमाकर लांडगे, अरुण रंमवाळ, विकास राठोड आदीनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!