जि. प. प्रा.शाळा भोजराजनगरचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

0
जि. प. प्रा.शाळा भोजराजनगरचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

जि. प. प्रा.शाळा भोजराजनगरचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

शिरुर अनंतपाळ (प्रतिनिधी) : मोबाईलच्या अतिव्यसनामुळे विद्यांर्थ्यासह पालकही कला श्रेत्रापासुन दुर जात आहे…जि.प.शाळा. भोजराजनगर हि 1987 साली सुरु झालेली वस्तीशाळा आज 290 विद्यार्थीसंख्या असलेली मोठी शाळा आहे हि शाळा तालुक्याचे वैभव आहे..या शाळेत विद्यार्थ्याचा शारिरिक, मानसिक, बौध्दीक विकास होतो.कला श्रेत्रातील कलावंताची जडणघडण स्नेहसंमेलनातुच होत असते म्हणुनच आपल्या विद्यार्थ्यांना या संधीचे सोन करायला शिकवा असे गौरवउद्दगार ज्येष्ठ शिक्षणतद्य. प्रभाकरराव कुलकर्णी गुरुजी यांनी उपस्थीत पालकांना दिला..
शहरातील जि.प.शाळा.भोजराजनगर शाळेच्या स्नेहसंमेलनात बोलत होते..कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. सुरेंद्र देवशटवार हे होते…मंचावर गटशिक्षणअधिकारी. अनिल पागे, नगराअध्यक्षा.सौ.मायावती धुमाळे, विस्तार अधिकारी. विजयकुमार संभाळे, चेअरमन. गोविंद हंद्राळे, प्रभागाचे नगरसेवक तथा शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य. श्री. सुधीर लखनगावे, गुरुनाथ शिंदाळकर, उमाकांत देवंगरे, नगरसेविका. खरटमोल कुसुम, शा.व्य.समितीच्या उपाध्यक्षा श्रीमती. अश्विनी लोंढे, सदस्या, श्रीमती. शिंदे ताई, श्रीमती. नाटकरे ताई, सचिन बेंबळगे, लोहार खंडु, सांगवे संगमेश्वर यांची उपस्थीती होती.

या शुभप्रसंगी शाळेत गुणवत्तापुर्ण शिक्षण दिले जाते व गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी शालेय सहल, नवोदया, स्काँंलरशीप, मंथन, अँंब्याकस,श्रेया परिक्षेसह विवीध उपक्रमाचे वर्षभरात आयोजन केले जात असल्याचे प्रास्ताविकातुन मुख्याध्यापक. राजेंद्र मुळखेडे यांनी सांगीतले…

यावेळी पहिली ते चौथीच्या विद्यांर्थ्यानी देशभक्तीपर गीत,श्री.गणेश वंदना,जय हो,संत. गोरोबाकाकांची दिंडी,पुष्पा.2, नैनो मे सपना,पिंगा ग पोरी पिंगा, मराठ मोळं गाणं,छत्रपती संभाजी महाराज, राणी माझ्या मळ्यामंदी असे विवीध गाणे, पथनाट्य सादर करुन उपस्थीतांची मने जिंकली..

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहीत बनसोडे तर आभार. सुर्यवंशी महादेव व देविदास सांगवे यांनी मानले..

या स्नेहसंमेलनाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक. श्री राजेंद्र मुळखेडे,सहशिक्षिका. श्रीमती विजया धुमाळे,श्रीमती. मनिषा भुरे,श्रीमती. सुर्यवंशी छाया, श्रीमती. अश्विनी देवशटवार, श्रीमती. आशा मुळे,श्री. देविदास सांगवे,श्री. महादेव सुर्यवंशी,श्री रोहीदास नाबदे, श्री काशिनाथ उंबरगे,श्री. छप्रावळे सर,श्रीमती. डामगिरे आदिंनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!