शासकीय कामात अडथळा; पती पत्नी विरूद्ध अहमदपूर पोलीसात गुन्हा दाखल

0
शासकीय कामात अडथळा; पती पत्नी विरूद्ध अहमदपूर पोलीसात गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा; पती पत्नी विरूद्ध अहमदपूर पोलीसात गुन्हा दाखल

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सावरगाव(थोट) ग्रामपंचायत कार्यालय यांच्या कडून गावातील जनसुविधा योजने अंतर्गत सिमेंट रस्त्याचे पोलीस संरक्षणात काम चालु आसताना गावातीलच पती पत्नी यांनी घरासमोरील रस्ता माझा आहे मजबुतीकरण करू देणार नाही म्हणुन ग्रामपंचायत अधिकारी तसेच पोलीसांच्या अंगावर जाऊन शिविगाळ करून स्वताः किटकनाशक विषारी औषध पिऊन पत्नीस सुद्धा पिण्यास सांगुन काम बंद करण्याचा प्रयत्न केला असुन ग्रामपंचायत अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती पत्नी यांच्या विरूद्ध अहमदपूर पोलीसात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दि 23 मे रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे

याविषयी साविस्तर माहीती अशी की अहमदपूर तालुक्यातील सावरगाव ( थोट ) येथील ग्रामपंचायत अधिकारी यांनी अहमदपूर पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,मी श्रीकृष्ण चंद्रपाल शेळके वय 42 वर्ष व्यवसाय- ग्रामपंचायत अधिकारी सावरगाव थोट रा डोंगरशेळकी ता उदगीर जि लातुर पोलीस स्टेशनला हजर येवुन फिर्याद लिहुन घेण्यास सांगता की मी वरील ठिकाणचा राहणारा असुन मी गेल्या दोन ते आडीच वर्षा पासुन सावरगाव थोट येथे नौकरीस आहे. आज दिनांक- 23/03/2025 रोजी मी कर्तव्यावर असताना ग्रामपंचायत सावरगाव थोट येथील जनसुविधा योजने अंतर्गत सिमेंट रस्ता करणे या कामाला मुख्य कार्यकारी अधीकारी जिल्हा परिषद लातुर यांनी प्रकाशासकीय मान्यता देवुन गटविकास अधिकारी पंचायत समिती अहदमपुर यांनी सदरील कामास कार्यारंभ आदेश दिल्यामुळे ग्रामपंचायतीने सदरील काम करण्यास सुरुवात केली काम सुरु असताना सारवगाव थोट येथील श्री शेषेराव शिवमुर्ती कोरनुळे व त्यांची पत्नी चंद्रकाला / सुनिता शेषेराव कोरनुळे यांच्या घरासमोर रस्त्याचे काम करत असताना सदरील जागा माझा मालकीची असल्याने रस्ता करण्यात येवु नये असे म्हणून काम बंद केले यापुर्वी सुद्धा त्याने दिनांक 06/03/2025 रोजी काम अडवले होते त्यामुळे त्याला त्याच्या जागेचे पुरावे सादर करण्यासाठी नोटीसी दिली होते त्यांनी ग्रामपंचायतीला त्यांच्या जागेबाबत कुठलेही पुरावे न दिल्याने ग्रामपंचातीने सदरील विषय गटविकास अधीकारी पंचायत समिती अहमदपुर यांना कळविले नंतर विस्तार अधिकारी पंचायत समिती यांना ग्रामपंचायतीला पाठवुन सदरील विषयाची चौकशी करुन अहवाल कळविण्यास सांगितले होते त्या प्रमाणे विस्तार अधीकारी पंचायत समिती यांनी आपला अहवाल गटविकास अधिकारी पंचायत समिती अहमदपुर यांना सादर केल्यामुळे गटविकास अधिकारी यांनी सदरील काम पोलीस संरक्षण देवून करण्यात यावे म्हणुन पोलीस अधिक्षक लातुर यांना पोलीस संरक्षण मिळणे बाबत कळविले होते त्या प्रमाणे पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता मध्यंतरी शेषेराव शिवमुर्ती कोरनुळे हे पंचायत समिती अहमदपुर कार्यालयासमोर उपोषणास बसले होते तेव्हा उपविभागीय अधीकारी अहमदपुर व गटविकास अधिकारी पंचायत समिती अहमदपुर यांनी उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली असता उपोषण मागे घेण्यात आले नंतर उपविभागीय अधिकारी अहमदपुर व गटविकास अधिकारी अहमदपुर हे प्रत्यक्ष कामाचे ठिकाणी हजर होवुन सदरील रस्ता अंदाज पत्रका प्रमाणे करण्यात यावे असे आदेश दिल्याने ग्रामपंचायतने बंद असलेले रस्त्याचे काम दिनांक 23/03/2025 रोजी 11.00 वा पोलीस संरक्षण घेवुन चालु केले असता शेषेराव शिवमुर्ती कोरनुळे व त्याची पत्नी चंद्रकाला / सुनिता शेषेराव कोरनुळे यांनी सदरील रस्त्याचे काम करण्यात येवु नये म्हणुन किटकनाशक औषध बॅाटल हातात घेवुन त्याच्या घराच्या बाहेर आले व मला म्हणाले की तुझी आज रविवारची सुटटी असताना तु रोडच्या कामाला कसाकाय आला तु फार शहाणा झाला आहेस काय असे म्हणुन त्याचे हातातील बॉटल त्याने त्याचे स्वताचे तोंडात ओतली ती बॉटल त्यांचे पत्नीला पिण्यास दिली त्यावेळी तेथे बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी पकडुन त्याचे हातातील बॉटल काढुन घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीसांचे अंगावर जावुन धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली व स्व:ता व त्याचे पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न करुन शासकीय कामात जाणुन बुजुन अडथळा केला आहे. तरी माझी शेषेराव कोरनुळे व त्याची पत्नी चंद्रकला / सुनिता कोरनुळे रा सावरगाव थोट यांचे विरुद्ध कायदेशीर तक्रार आहे
ग्रामपंचायत अधिकारी श्रीकृष्ण चंद्रपाल शेळके यांनी वरील प्रमाणे दिलेल्या फिर्यादीवरून शेषेराव शिवमुर्ती कोरनुळे व त्याची पत्नी चंद्रकाला / सुनिता शेषेराव कोरनुळे यांच्या विरूद्ध अहमदपूर पोलीसात दि 23 मार्च रोजी गुरन नं 0207/2025 भारतीय न्याय संहिता ( बी.एन.एस ) 2023 कलम 226, 132,352 नुसार शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!