अखेर माळेगाव- अहमदपूर शिव रस्ता झाला मोकळा
अखेर माळेगाव- अहमदपूर शिव रस्ता झाला मोकळा
अहमदपूर (गोविंद काळे) : अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला माळेगाव (खुर्द)- अहमदपूर हा शिव रस्ता शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून, आणि तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्या सहकार्याने मोकळा झाला असून त्या शेत रस्त्याचे उद्घाटन तहसीलदार पांगरकर यांच्या हस्ते दि. २१ रोजी संपन्न झाले.
सदर शिवरस्ता मोकळा/ खुला करण्यात यावा अशी अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु तो काही खुला होत नव्हता म्हणून शेतकऱ्यांनी नव्याने आलेल्या तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्याकडे मागणी केली असता, तहसीलदार सौ. पांगरकर यांनी जाय मोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, व ३० फुटांचा रस्ता मोकळा करून दिला आहे. यामुळे शेतकऱ्यातून आनंद व्यक्त होत आहे कारण या रस्त्या अभावी अनेक शेतकऱ्यांना विविध समस्यांच्या सामोरे जावे लागत होते, तर काही अंशी ग्रामस्थ तणावग्रस्त वातावरणात वावरत होते. त्या समस्यांना आता निश्चितच पायबंद होणार असल्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
यावेळी मंडळ अधिकारी कैंचे, ग्रामविकास अधिकारी गुपीले, तलाठी खोमणे, भूमापन अधिकारी मोतीपवळे, पोलीस प्रशासनाचे जमादार चिमनदरे, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडगे, शेतकरी मारुती भरडे, सोमनाथ भरडे, प्रतीक भरडे, बाळू भरडे, केशवराव गाडगे, रामदास गाडगे, बालाजी भरडे, गंगाधर भरडे, सतीश शेळके, हनुमान शेळके, गुरुनाथ भरडे आदींची उपस्थिती होती.
