जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांची डॉ. सुनिल कच्छवे यांनी केली तपासणी

0
जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांची डॉ. सुनिल कच्छवे यांनी केली तपासणी

जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांची डॉ. सुनिल कच्छवे यांनी केली तपासणी

हमदपूर (गोविंद काळे) : जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त भारतीय दंत चिकित्सक संघटना शाखा लातूर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यासाठी डॉक्टर सुनील कच्छवे, डॉ. शुभम सावते, डॉ. मेघराज हांडे हे सर्व डॉक्टर आज जय हिंद प्रयाग प्राथमिक विद्यालय व अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात उपस्थित होते. सर्व उपस्थित डॉक्टरचे विद्यालयाच्या वतीने स्वागत मुख्याध्यापक प्रशांत माने यांनी केले. डॉक्टर सुनील कच्छवे यांनी विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्य देण्याचे महत्त्व पटवले व आपण कशाप्रकारे आज विविध मौखिक आजारावर आजाराला सामोरे जात आहोत. जागतिक मौखिक आरोग्य दिनाचे उद्दिष्ट हे आहे की मौखिक आरोग्य सुरक्षित करण्यासाठी ज्ञान साधने आणि आत्मविश्वास देऊन सक्षम करणे.
सर्व डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची मौखिक तपासणी व दंतचिकित्सा करून त्यांना ब्रश व पेस्ट याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कदम यांनी केले तर आभार अभय कच्छवे यांनी मांडले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!