आय. पि.एस अधिकारी सागर खर्डे यांची उत्कृष्ट कामगिरी ; बनावट नोटासह ४ लाख ८५ हजाराचा गुटखा व मुद्देमाल जप्त

0
आय. पि.एस अधिकारी सागर खर्डे यांची उत्कृष्ट कामगिरी ; बनावट नोटासह ४ लाख ८५ हजाराचा गुटखा व मुद्देमाल जप्त

आय. पि.एस अधिकारी सागर खर्डे यांची उत्कृष्ट कामगिरी ; बनावट नोटासह ४ लाख ८५ हजाराचा गुटखा व मुद्देमाल जप्त

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील अवैद्य धंद्याना आळा घालण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक आय. पि.एस अधिकारी यांनी विविध पथकांची निर्मिती केली असुन शहरातील क्रांती चौक तसेच काळेगाव रोड वरील हिना लॉज येथे बनावट नोटा तसेच महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्यावर कार्यवाही करून ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन अहमदपूर पोलीसात तीन जणांवर दि २३ व २५ मार्च रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

         याविषयी सविस्तर माहीती, अशी की लातुर जिल्ह्यातील अवैद्य धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर प्रशिक्षणार्थी प्रभारी पोलीस निरिक्षक तथा सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर खर्डे अहमदपूर यांनी वेगवेगळ्या पथकाची निर्मिती केली असुन  एक पथक  गस्तीवर असताना गोपीनीय माहीतीच्या आधारे दि २३ मार्च रोजी सकाळी ०७ : ०० वाजता  महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा क्रांती चौक चौक येथे चोरट्या पद्धतीने विक्रि व वाहतुक करत असताना विमल पान मसाला, तंबाखु,रजनीगंधा पान मसाला एम.एच १२ एल. पि ५७५० क्रमांकाची टाटा कंपनीची इंडिगो जुन्या कार सहीत २ लाख ९२ हजार १०० रूपयांच्या मुद्देमाल जप्त करून पोकॉ रूपेश बालाजी कज्जेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्लाबक्ष इलाही तांबोळी वय ३१ वर्षे  रा. मारवाडी गल्ली अहमदपुर  ता अहमदपूर याच्या विरूद्ध अहमदपूर पोलीसात दि २३ मार्च रोजी गुरन व कलम- २०६/२०२५ कलम १२३, २२३, २७४, २७५  भारतीय संहिता सह कलम  ५९ अन्न सुरक्षा मानदे अधिनीयम 2006 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
                    त्याचप्रमाणे दि २४ मार्च रोजी संध्याकाळी ०७ : ५० वाजता  गुप्त माहीतीच्या आधारे शहरातील काळेगाव रोड वरील हिना लॉज जवळ दोघे जण बनावट नोटा चलनात चालवत असल्याची माहीती मिळताच तात्काळ सापळा रचुन ५००, २०० ,१०० रूपेच्या १२ हजार ७०० रूपयेच्या बनावट नोटा सहीत ५००, २००,१००, ५०, २०,  रूपयांच्या खऱ्या नोटा अॅपल , नोकीया कंपनीचा जुना मोबाईल रेनॉल्ट कंपनीची इटीयॉस पांढऱ्या कलरची गाडी क्र एम.एच २४ व्ही ४८४७ आदी सह १ लाख ९२ हजार ५०० रू मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोह तानाजी व्यंकट आरदवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  1) मिर्झा शोएब बेग मिर्झा अन्वर बेग, वय 29 वर्षे, 2) मिर्झा याकुब बेग मिर्झा अन्वर बेग वय 15 वर्षे  दर्वेश नगर हिंगोली नाका नांदेड ता. नांदेड जि नांदेड यांच्यावर दि २५ मार्च रोजी अहमदपूर पोलीसात 

गुरन नं-२१० / २०२५ कलम १७८, १७९, १८० ,३ ( ५ ) भारतीय न्याय २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपींना अटक करण्यात आली आहे
सदरील दोन्ही प्रकरणात एकून बनावट नोटासह ४ लाख ८५ हजाराचा गुटखा व मुद्देमाल जप्त करून आय. पि. एस सागर खर्डे यांनी उत्कृष्ट कार्य केले असुन त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे तर खर्डे यांनी गेल्या विस ते पंचेविस दिवसात अवैद्य वाळू , प्रतिबंधीत गुटख्यावर कार्यवाही करून जवळपास १ ते सव्वा कोटी रूपयेचा मुद्देमाल जप्त केल्यामुळे अवैद्य धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!