संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या अमृता जयपद्म वजीर, सार्थक दिगंबर मेंडके या दोन विद्यार्थ्यांची लातूर च्या जवाहर नवोदय विद्यालयात शहरी भागातून प्रवेशासाठी निवड झाली आहे. या परीक्षेला ग्रामीण भागातून 80 टक्के व शहरी भागातून 20 टक्के जागा असतात. शहरी भागातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना सविता पाटील, प्राजक्ता भोसले, शारदा तिरुके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष गणेश दादा हाके-पाटील, सचिव प्राचार्या रेखाताई हाके-तरडे, उपाध्यक्षा एडवोकेट मानसी हाके, संस्था समन्वयक कुलदीप भैय्या हाके, अमरदीप हाके, मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
