जागतिक क्षयरोग सप्ताह निमित्य रोटरी व ग्रामीण रुग्णालया च्या वतीने फूड बास्केट चे वाटप
जागतिक क्षयरोग सप्ताह निमित्य रोटरी व ग्रामीण रुग्णालया च्या वतीने फूड बास्केट चे वाटप
अहमदपूर (गोविंद काळे) : जागतिक क्षयरोग सप्ताह निमित्त अहमदपूर येथे रोटरी क्लब व ग्रामीण रुग्णालय अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग बाधित रुग्णांना फूड बास्केट चे वाटप करण्यात आले.
सर्वत्र वेगाने पसरत असलेल्या क्षयरोगावरती नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र सरकार मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे.
यामध्ये संशयित रुग्णांच्या तपासण्या करणे, रुग्णाची ओळख पटल्यानंतर त्यांना नियमित औषधोपचार देणे व रुग्णांच्या सभोवताली असणाऱ्या सर्व व्यक्तींची तपासणी करणे जेणेकरून संशयित आढळल्यास त्यांच्यावर त्वरित उपचार करणे . व इतर अनेक उपक्रम आरोग्य विभागातर्फे चालवण्यात येत आहेत.
याचाच एक भाग म्हणून जागतिक क्षयरोग सप्ताह निमित्त क्षयरोग बाधित रुग्णांना त्यांना पूरक असे अन्न व प्रोटीन्स मिळावे यासाठी फुटबोस्केट देण्यात येत आहेत.
अहमदपूर येथे ग्रामीण रुग्णालयात दिनांक 28 मार्च रोजी रोटरी क्लब व ग्रामीण रुग्णालय यांनी संयुक्त उपक्रम घेऊन क्षयरोग बाधित रुग्णांना अशा फूड बास्केट चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ .जयप्रकाश केंद्रे हे होते तर या कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष राजीव कल्याणे, सचिव अनिल फुलारी, डॉ. प्रवीण जगताप, डॉ. नाथराव कराड डॉ .रमेश केंद्रे, भरत ईगे, अनिल चवळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व क्षयरोगाबद्दल मार्गदर्शन डॉ. प्रवीण जगताप यांनी केले. यावेळी रोटरीच्या वतीने प्रा अनिल चवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिस्टर मारथा भुसूम, सिस्टर प्रवीणा पाटील व एस टी एस राजेंद्र पांडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सूर्यवंशी यांनी केले तर आभार सिस्टर प्रवीणा पाटील यांनी मांडले.
