किलबिलच्या एकूण सात विद्यार्थ्यांचीजवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
किलबिलच्या एकूण सात विद्यार्थ्यांचीजवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कूल शाळेतील इयत्ता पाचवी वर्गातील कुमारी वैभवी सावरगावे, श्लोक आलापुरे, संभाजी तिडके,संस्कार तेलंग, संस्कार वलसे , शौर्य वाघमारे यांची इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी निवड झाली असून कुमारी मैथिली राठोड हिची इयत्ता नववी साठी निवड झाली आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळ अधिकारी माधव जोशी व विषय तज्ञ डॉ कामक्षी पवार प्राचार्य संतोष पाटील उपप्राचार्य धरमसिंग शिराळे उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील स्पर्धा परीक्षा प्रमुख ज्ञानेश्वर जाधव व धनेश्वर आगलावे सर यांनी मार्गदर्शन केले.
