शैक्षणिक प्रशिक्षणाने शिक्षक परिपक्व अध्यापन करतो डायट च्या प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी यांची प्रतिपादन

0
शैक्षणिक प्रशिक्षणाने शिक्षक परिपक्व अध्यापन करतो डायट च्या प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी यांची प्रतिपादन

शैक्षणिक प्रशिक्षणाने शिक्षक परिपक्व अध्यापन करतो डायट च्या प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी यांची प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : बदललेल्या युगामध्ये सर्वच क्षेत्रात क्रांतिकारक असे स्वरूपाचे बदल झालेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना आधुनिक स्वरूपाचे ज्ञान देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध प्रकाराची अभ्यासक्रमाची प्रशिक्षण चालविण्यात येत आहेत. त्यात स्टार्स प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी दीक्षा पोर्टलवर ऑनलाईन कोर्स उपलब्ध करून देण्यात आले होते आणि या कोर्सच्या अटी प्रमाणे ऑनलाइन कोर्स केलेल्या पात्र शिक्षकांची पी. एल. सी. प्रशिक्षण तालुकास्तरावर दि.22-3-2025 रोजी पूर्ण करून घेण्यात आले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक परिपक्व होऊन विद्यार्थ्यांच्या समोर अध्यापन करतो असे आग्रही प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉक्टर भागीरथी गिरी यांनी केले.
त्या राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि राज्यस्तरीय गरजाधिष्टीत मिश्र माध्यम अभ्यासक्रम प्रशिक्षण 2024- 25 च्या ऑनलाइन उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. जिल्हा प्रशिक्षण समन्वयक डॉ. जगन्नाथ कापसे, यांच्या मार्गदर्शनानुसार व गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या नियोजनानुसार सदरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका प्रशिक्षण समन्वयक डॉ. कामाक्षी पवार होत्या. व्यासपीठावर सुलभक रत्नप्रभा मंडलवार, सुलभक श्रीमती मनीषा गुणाले, सुलभक शिवकुमार मठपती,सुलभक एस एम महालिंगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की शिक्षकांनी नेहमी स्वतःला अपडेट ठेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे जाहीर आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप तालुका समन्वयक डॉक्टर कामाक्षी पवार यांच्या भाषणाने झाला.
या शिबिरात मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, प्राथमिक, माध्यमिक विषयाच्या शिक्षकांनी प्रशिक्षणात सहभाग घेऊन ऑनलाइन मिश्र माध्यमिय अभ्यासक्रम व्यवसायिक अध्ययन समूह पी एल सी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवकुमार मठपती यांनी सूत्रसंचालन माधव मठवाड यांनी तर आभार राम तत्तापूरे यांनी मांनले.
या प्रशिक्षणात सबंध तालुक्यातून 73शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गट संधान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!