विद्यावर्धिनी विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

0
विद्यावर्धिनी विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

विद्यावर्धिनी विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील विद्यावर्धिनी विद्यालयात नगरपरिषद अहमदपूर अग्निशमन दलातर्फे नैसर्गिक आपत्तीचा सामना कसा करावा याचे धडा देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नैसर्गिक आपत्ती आल्यावर नेमके काय करावे,मदत काय करायची आपत्तीग्रस्तांना कोणत्या वस्तूची आवश्यकता असते या याबाबत मुलांना मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाला उपस्थित संस्था अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा पाटील तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अग्निशमन दलाचे विभाग प्रमुख , कैलास सोनकांबळे तसेच प्रशांत गायकवाड, प्रकाश जाधव, अजितकुमार लाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशांत गायकवाड सर यांनी मुलांना नैसर्गिक आपत्ती रोखणे कोणाच्या हातात नसते परंतु अशा आपत्तीनंतर योग्य खबरदारी घेऊन मोठ्या प्रमाणावर होणारी हानी मात्र टाळता येते. त्यासाठी सर्वांनी सावधगिरीने ,सामजस्याने आपली काळजी घेतली पाहिजे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कैलास सोनकांबळे, प्रकाश जाधव ,अजितकुमार लाळे यांनी मुलांना आग लागल्यानंतर उपलब्ध साहित्याचा वापर कशाप्रकारे करावा व अग्निशमन बंब चा वापर कशाप्रकारे करावा याचे प्रात्यक्षिक मुलांना व शाळेतील शिक्षकांना दिले. या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश जाधव यांनी केले. तर आभार उमाकात श्रीमंगले यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!