अहमदपूरात जिजाऊ- सावित्री व्याख्यानमालेचे आयोजन

0
अहमदपूरात जिजाऊ- सावित्री व्याख्यानमालेचे आयोजन

अहमदपूरात जिजाऊ- सावित्री व्याख्यानमालेचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद सह सर्व परिवर्तनवादी संघटना अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदपूरमध्ये जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेचे आयोजन संस्कृती मंगल कार्यालय, अहमदपूर येथे वेळ : सायं. ६.०० वाजता करण्यात आले आहे.

या विषयीची सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर येथील मराठा सेवा संघ व समविचारी संघटनाच्या वतीने गेल्या १९ वर्षापासून जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते व्याख्यानासाठी निमंत्रीत करण्यात आले. या १९ व्या वर्षाच्या व्याख्यानमालेसाठी दि. १ एप्रिल रोजी विषयः स्त्री -काल, आज आणि उद्या ! वक्त्या : प्रा. भारती मडवई, नांदेड ( प्रवक्त्या, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र ),दि. २ एप्रिल रोजी विषयः छत्रपती घराज्यांचा चार पिढयांचा संघर्ष वक्ते प्रा. अजयदादा जाधवराव सातारा ( इतिहास अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते ) दि.३ एप्रिल रोजी विषय : फुले, शाहू, आंबेडकरांचा लोकशाहीचा लढा वक्ते : प्रा. जावेद पाशा, नागपूर ( सामाजिक कार्यकर्ते ) आदी मान्यवर वरील विविध विषयावर तीन दिवस पुष्प गुंफणार आहेत. तरी या व्याख्यानमाले शहरासह तालुक्यातील व्याख्यान प्रेमी सुजान नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!