आय. पि.एस अधिकारी सागर खर्डे यांची एक महीण्यापासुन दमदार कामगिरी; गुटखा व अवैद्य वाळुवर कार्यवाही ; २५ लाख ३८ हजाराचा गुटखा वाळुसह मुद्देमाल जप्त

0
आय. पि.एस अधिकारी सागर खर्डे यांची एक महीण्यापासुन दमदार कामगिरी; गुटखा व अवैद्य वाळुवर कार्यवाही ; २५ लाख ३८ हजाराचा गुटखा वाळुसह मुद्देमाल जप्त

आय. पि.एस अधिकारी सागर खर्डे यांची एक महीण्यापासुन दमदार कामगिरी; गुटखा व अवैद्य वाळुवर कार्यवाही ; २५ लाख ३८ हजाराचा गुटखा वाळुसह मुद्देमाल जप्त

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील अवैद्य धंद्याना आळा घालण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक आय. पि.एस अधिकारी यांनी विविध पथकांची निर्मिती केली असुन तालुक्यातील हाडोळती येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा तसेच शहरातील थोडगा रोड चामे गाईन येथे अवैद्य वाळूचा हायवा ट्रक वर कार्यवाही करून २५ लाख ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन अहमदपूर पोलीसात पाच जणांवर दि २९ मार्च रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी सविस्तर माहीती, अशी की लातुर जिल्ह्यातील अवैद्य धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर प्रशिक्षणार्थी प्रभारी पोलीस निरिक्षक तथा सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर खर्डे अहमदपूर यांनी वेगवेगळ्या पथकाची निर्मिती केली असुन गोपीनीय सुत्रांच्या माहीतीच्या आधारे दि २८ मार्च रोजी संध्याकाळी ०९ : ३० वाजता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा तालुक्यातील हाडोळती येथील दयानंद विद्यालयाच्या बाजुस हाडोळती येथीलच आरोपीच्या घरी गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखु चोरट्या पद्धतीने साठवणुक व विक्रि करत असताना अचानक छापा टाकून १८ हजार ८० रू मुद्देमाल जप्त करून पोहेकॉ हनुमंत पंडीतराव आरदवाड यांच्या फिर्यादी वरून आकाश बालाजी कोटगीरे , इनायत जमाल फकीर दोघे रा हाडोळती ता अहमदपूर यांच्या विरुद्ध अहमदपूर पोलीसात गुरनं २१५ / २०२५ कलम १२३ , २२३, २७४, २७५ भारतीय न्याय संहिता सह कलम ५९ अन्न सुरक्षा मानदे अधिनियम २००६ नुसार दि २९ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर शनिवार दि २९ मार्च रोजी अहमदपूर शहरातील थोडगा रोड चामे गार्डन जवळ सकाळी ०६ : ४० सुमारास टाटा कंपनीचा हायवा टिप्पर क्र एम.एच २६ बि. ई ६०८६ विना पास परवाना अवैद्य रित्या वाळूची चोरटी करण्याच्या उद्देशाने मिळून आला असुन २५ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोकॉ रूपेश बालाजी कज्जेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश नागोराव ढाले वय ३५ वर्ष, मालक रमेश दिगांबर कदम रा बेनाळ ता लोहा जि नांदेड आदी सह तीन जणां विरुद्ध गुरनं २१६ / २०२५ कलम ३०३ ( २ ), व कलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील दोन्ही प्रकरणात २५ लाख ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रभारी पोलीस निरिक्षक तथा सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर खर्डे यांनी गेल्या एक महीन्यापासुन अवैद्य धंदेवाल्यांना सळो की पळो करून सोडले आहे त्यामुळे तालुक्यातील नागरीक त्यांच्या कार्यावर समाधानी आहेत तर महसुल प्रशासन मात्र या प्रश्नाकडे का गांभीर्य दाखवत नाही हे सुजाण नागरीकांना पडलेला एक प्रश्न आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!