विलास सहकारी साखर कारखाना निवडणुक बिनवीरोध, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्यासह २१ संचालकांची बिनवीरोध निवड

विलास सहकारी साखर कारखाना निवडणुक बिनवीरोध, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्यासह २१ संचालकांची बिनवीरोध निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : विलास सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी झालेल्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील “विलासराव देशमुख सहकार” पॅनलचे सर्व अर्ज छानणीनंतर पात्र ठरले. यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी जाहीर केले आहे.
राज्याचे माजी मत्री आ. अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या विलास साखर कारखान्याने मागच्या २५ वर्षात उत्कृष्ट कार्य व व्यवस्थापनाची अनेक उच्चांक प्रस्तापीत करुन साखर कारखानदारी क्षेत्रात आदर्श निर्माण केला. या माध्यमातून लातूर जिल्हयात आर्थिक क्रांती घडवली आहे. ग्रामीण जीवनमान उंचावले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, विद्यमान चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, माजी आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मावळत्या संचालक मंडळाने अत्यंत उत्कृष्टरीत्या काम करून ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, शेतमजूर यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अत्यंत उत्तम काम केले आहे.
मांजरा परीवारात स्थापन झालेला आणि अत्यंत कडक शिस्तीच्या वातावरणात वाटचाल करीत असलेला विलास सहकारी साखर कारखान्याने एकुण २४ गळीत हंगामात ३६ पेक्षा अधिक राज्य आणि देशपातळीवरील पुरस्कार आणि पारितोषिके मिळवली आहेत. नेहमीच आधुनीक तंत्रज्ञान आणि प्रयोगशीलतेचा अवलंब करीत उस उत्पादकांना अधिकात अधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न या कारखान्याच्या माध्यमातून झालेला आहे. संचालक मंडळाने फक्त विश्वस्थाची भुमिका निभावल्यामुळे प्रत्येक सभासद शेतकऱ्यांला हा कारखाना आपल्याच मालकीचा असल्याचा विश्वास वाटतो आहे.
यावेळी कारखान्याची निवडणुक जाहीर झाल्यानंतर नेतृत्वाकडून संचालक मंडळासाठी उमेदवार निवडतांना वेगळा प्रयोगाचा अवलंब केला. यापुर्वीच्या संचालक मंडळातील ५ अनुभवी तर विद्यमान संचालक मंडळातील ८ जणांना पून्हा संधी देत नवख्या ८ जणांना उमेदवार म्हणून निवडण्यात आले, परिणामी सर्वसमावेशक संचालक मंडळ निवडल्याचा संदेश कारखाना सभासदामध्ये गेला आहे. कारखान्याचे विश्वस्त चांगले निवडल्याची चर्चा होवून सर्वांनी या पॅनलला एकमुखी पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत २१ जागेसाठी फक्त २३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सोमवार दि. १७ मार्च रोजी अर्जाची छानणी झाली. १८ मार्च रोजी निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती रोहीनी नऱ्हे यांनी २१ पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली. हे सर्व पात्र उमेदवार विलासराव देशमुख सहकार पॅनलचे असल्याने या पॅनलने सदरील निवडणुक जिंकली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम २०१४ नियम ३२ अन्वये झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे यांनी काम पाहीले. सदरील निववडणूक बिनविरोध झाली असल्याचे दि. २ एप्रिल रोजी जाहीर केले आहे.
या निवडणुकीत विलासराव देशमुख सहकार पॅनलमधून बिनविरोध निवडूण आलेल्या संचालक मंडळात माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख (उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था मतदारसंघ), विद्यमान चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, लताबाई रमेश देशमुख (महीला प्रतिनीधी), रविंद्र व्यंकटराव काळे, नरसिंग दगडू बुलबुले, रसुल दिलदार पटेल (उसउत्पादक मतदारसंघ निवळी (वैशालीनगर) तात्यासाहेब छत्तू पालकर, रंजीत राजेसाहेब पाटील, गोवर्धन मोहनराव मोरे (गट शिराळा गट), वैजनाथराव ग्यानदेवराव शिंदे, आनंत व्यंकटराव बारबोले, हणमंत नागनाथराव पवार,नेताजी शिवाजीराव साळुंके (देशमुख), नितीन भाऊसाहेब पाटील, रामराव विश्वनाथ साळुंके, (कासार जवळा गट) अमित विलासराव देशमुख, अमृत हरिश्चंद्र जाधव, सतिष विठ्ठलराव शिंदे (पाटील), (विलासनगर (चिंचोलीराववाडी गट), दिपक अर्जुन बनसोडे, (बाभळगाव गट) अनुसुचीत जाती प्रतिनीधी), बरुरे शाम (इतर मागसवर्गीय प्रतिनीधी), भारत माने सुभाष खंडेराव भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग) यांचा समावेश आहे.