हंगाम 2024-25 मधील सोयाबीन खरेदीमध्ये रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाफेड खरेदी केंद्र अव्वल

हंगाम 2024-25 मधील सोयाबीन खरेदीमध्ये रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाफेड खरेदी केंद्र अव्वल
उदगीर (एल.पी.उगीले) : हंगाम 2024-25 केंद्र शासाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीकरिता ऑनलाईन शेतकरी नोंदणी दिनांक 01 ऑक्टोबर 2024 पासून सुरु करण्यात आली होती. तरी रंगराव पाटील नाफेड खरेदी केंद्राकडे 3180 शेतकऱ्यांने नोंद केली होती, प्रत्यक्षात सोयाबीन खरेदी हि 15 ऑक्टोबर 2024 पासुन सुरु करण्यात आली व अंतिम तारीख 6 जानेवारी 2025 होती, या कालावधीमध्ये रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार नाफेड खरेदी केंद्राने खरेदी करण्यासाठी 4 ऑटोमॅटीक मशीन, 8 चाळण्याच्या साह्याने 3180 शेतकऱ्या पैकी 3057 शेतकऱ्याचे तब्बल 84000 क्वीनटल सोयाबीन खरेदी करुन उच्चांक गाठला आहे. हे करत असताना शेतकऱ्याची उत्तम सोय करण्यात आली होती. त्यांच्या वाहनाच्या पार्किंगची व्यवस्था असेल किंवा त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व त्यांच्या नाष्ट्याची व्यवस्था सुद्धा उत्तम करण्यात आली होती. त्यामुळे रंगराव पाटील कृषी उत्पन्न खाजगी बाजार नाफेड केंद्राचे चे अध्यक्ष भास्कर रंगराव पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.