मोफत ॲनिमिया तपासणी शिबिर

मोफत ॲनिमिया तपासणी शिबिर
उदगीर (एल.पी.उगीले) : रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल, सामान्य रुग्णालय उदगीर व इंटरॅक्ट क्लब ऑफ सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात मोफत ऍनिमिया तपासणी शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका मंजुषाताई कुलकर्णी, प्रमुख पाहुणे रोटरी क्लबच्या अध्यक्ष सरस्वती चौधरी व रोटरी क्लबच्या सचिव ज्योती चौधरी, मार्गदर्शक डॉ. प्रियंका राठोड, व सेमी विभाग प्रमुख सौ आशाताई बेंजरगे, शिक्षिका अनुराधा धोंड, मळभागे राचममा इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख उपस्थित म्हणून संतोष फुलारी, व्हि. एस. कणसे, विक्रम हलकीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष यांनी सर्टिफिकेट देऊन इंटरॅक्ट क्लबच्या मुलांचे कौतुक केले. इंटरॅक्ट क्लब ची सचिव अंजली कपाळे या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. इंटरॅक्ट क्लब चा अध्यक्ष यश चौधरी या विद्यार्थ्यांनी अहवाल वाचन केला. डॉ. प्रियंका राठोड यांनी मुलींना मार्गदर्शन केले. व हँडवॉश कसे करायचे हे सुद्धा कृती करून दाखवले. रोटरी क्लबचे अध्यक्ष सरस्वती चौधरी यांनी सुद्धा अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे एनिमिया तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी तक्षशिला चौधरी या विद्यार्थिनींनी केले तर आभार पल्लवी हलमडगे या विद्यार्थ्यांनी केले.