उदगीर विधिज्ञ संघाच्या निवडणूकीत वर्षा पंकज कांबळे यांची बिनविरोध निवड

उदगीर विधिज्ञ संघाच्या निवडणूकीत वर्षा पंकज कांबळे यांची बिनविरोध निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुका विधिज्ञ वकील संघाच्या पदाधिकारी निवड २०२५ – २६ साठी २८ मार्च रोजी झालेल्या निवडणूकीत सर्वसमावेशक समतावादी पॅनलचा दनदतीत विजय झाला आसून तालुका विधिज्ञ संघाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष आणि ग्रंथालय सचिव, महिला प्रतिनिधी या पदावर उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या तथा समाजसेविका, ख्यातनाम विधीज्ञ वर्षा पंकज कांबळे यांनी महिला प्रतिनिधी म्हणून अर्ज दाखल केला होता. शहरातील त्यांची लोकप्रियता विचारात घेऊन त्यांना बिनविरोध निवडून दिले आहे. सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्यामुळे वर्षा पंकज कांबळे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी मान्यवर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
चुरशीच्या झालेल्या या अटीतटीच्या निवडणूकीत समतावादी पॅनलचे उदगीर विधिज्ञ संघाच्या अध्यक्षपदी ॲड .आनंद मुंढे तर उपाध्यक्षपदी ॲड.गितानंद अक्कनगिरे हे निवडून आले आहेत.विजयी इतर उमेदवार पुढील प्रमाणे, सचिव पदासाठी ॲड . चंद्रशेखर वामनराव भोसले, सहसचिव पदी ॲड. शरदचंद्र शेषराव पाटील, कोषाध्यक्ष म्हणून ॲड . विजयकुमार सुभाष पाटील माने, ग्रंथालय सचिव म्हणून ॲड . अमोल तुकाराम कळसे या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला. तर तत्पूर्वीच ॲड. वर्षा पंकज कांबळे, ॲड.संतोषीमाता मारुती सुर्यवंशी(महिला उपाध्यक्षपदी) , ॲड .अश्लेषा चंद्रकांत बिरादार (महिला सहसचिव) या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड . महेश माशाळकर यांनी काम पाहीले तर सहाय्यक म्हणून ॲड. संदीप भांगे यांनी सहकार्य केले. विजयी उमेदवारांचा सत्कार जेष्ठ विधिज्ञ ॲड.एस.टी.पाटील,ॲड. भरत एम. गुंडरे,ॲड.बालाजी पाटील, ॲड. बाळासाहेब नवटक्के, ॲड.तानाजी केंद्रे,ॲड.सोपनराव धोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.