लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे स्पर्धा परीक्षेत उज्वल यश

लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे स्पर्धा परीक्षेत उज्वल यश
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना परीक्षा 2024 -25 चा निकाल फेब्रुवारी महिन्यात जाहीर झाला होता. या परीक्षेची गुणवत्ता यादी दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी जाहीर झाली असून लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयातील 4 विद्यार्थी एन एम एम एस शिष्यवृत्तीस पात्र ठरले तर सारथी शिष्यवृत्तीसाठी 7 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. व 31 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पात्र झालेले विद्यार्थी प्रांजल भगवान पाटील,भक्ती दिनेश देवनाळे, स्मिता अनिल पाटील,प्रज्वल संजय राठोड
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक कृष्णा मारावार, पर्यवेक्षक किरण नेमट, एन एम एम एस विभाग प्रमुख दिलीप पाटील हे उपस्थित होते.
एन एम एम एस शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर ,कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य ,मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा चंद्रकांत मुळे, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार ,कार्यवाह शंकरराव लासुणे ,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, उपमुख्याध्यापक अरुण पत्की, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, पर्यवेक्षक किरण नेमट पर्यवेक्षक माधव मठवाले, दिलीप पाटील व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.