लोहारा येथील प्रगतशील शेतकरी श्याम सोनटक्के यांच्या फार्मला डॉ. अच॔नाताई पाटील चाकूरकर यांची सदिच्छा भेट

0
लोहारा येथील प्रगतशील शेतकरी श्याम सोनटक्के यांच्या फार्मला डॉ. अच॔नाताई पाटील चाकूरकर यांची सदिच्छा भेट

लोहारा येथील प्रगतशील शेतकरी श्याम सोनटक्के यांच्या फार्मला डॉ. अच॔नाताई पाटील चाकूरकर यांची सदिच्छा भेटलोहारा येथील प्रगतशील शेतकरी श्याम सोनटक्के यांच्या फार्मला डॉ. अच॔नाताई पाटील चाकूरकर यांची सदिच्छा भेट

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील लोहारा येथे प्रगत शेतकरी श्याम सोनटक्के यांनी”विषमुक्त खा-निरोगी रहा” असा नारा देत आपल्या 70 एकरावर 100% सेंद्रिय शेतीचा विस्तार केला आहे. या 70 एकर लागवडी योग्य जमिनीत गावरान मूग,उडीद,बासमती साळ,तूर,खपली गहू,बन्सी गहू,दगडी ज्वारी, पिवळी ज्वारी, तीळ, कांदा, लसूण आदी पिकांची शेती सोनटक्के करतात. अन विशेष बाब म्हणजे या पिकांच्या विक्रीसाठी त्यांना कुठेही बाजारात घेऊन जाण्याची गरज भासत नाही, त्यांनी आपल्या बांधावरच मार्केट तयार केले आहे. हा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा, असे विचार भाजपने त्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले.
निसर्ग शेती ची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी डॉक्टर अर्चना पाटील यांनी लोहारा येथील श्याम सोनटक्के यांच्या फार्मला भेट दिली तसेच निसर्ग शेतीच्या उत्पादनातील धान्य ही खरेदी केले.चाकूरकर परिवार सुद्धा सोनटक्के यांचे ग्राहक आहोत. असे स्पष्ट केले. श्याम सोनटक्के यांनी 150 च्या वर व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. त्या माध्यमातून ते आपल्या शेतीमालाची मार्केटिंग स्वतः करतात. ग्राहक त्यांच्या शेतात येऊन माल खरेदी करतात. आशा पध्दतीने शेतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्याम सोनटक्के यांना देशी गायीची आवड असल्याने त्यांनी सुभद्रा गोपालन फार्म सुद्धा तयार केले आहे. शेतीला पशुपालनाची जोड देत त्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे.
त्यांच्या या कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल घेत. श्याम सोनटक्के यांना सन २०२१ चा महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. नैसर्गिक शेतीचे स्वप्न बाळगून प्रत्येक शेतकऱ्याने रासायनिक खतांचा वापर टाळत नैसर्गिक शेतीवर भर दिला पाहिजे. श्याम सोनटक्के यांना भेटून आनंद झाला. त्यांच्या फार्मची पाहणी करत नैसर्गिक शेतीविषयक अतिशय सखोल माहिती घेतली. असेही याप्रसंगी अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!