सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये ग्रॅज्युएशन सेरेमणी मोठ्या उत्साहात साजरा

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये ग्रॅज्युएशन सेरेमणी मोठ्या उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता.अहमदपूर येथे काल दि. 29/03/2025 रोजी UKG क्लासचा ग्रॅज्युएशन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री.गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, आणि प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी रमेश कासले व मंडळाच्या सचिव रेखाताई तरडे मॅडम उपस्थित होत्या. तथा सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल चे संचालक कुलदीप हाके पाटील व संचालिका सौ.शिवालिका कुलदीप हाके पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे संचालक कुलदीप हाके पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कोईलवाड सर यांनी केले. या कार्यक्रमात UKG क्लासच्या विद्यार्थ्यांनी डान्स, कविता, नाटके, आणि भाषणे सादर केली ग्रॅज्युएशन डे ची वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमात बोलताना डॉक्टर मोहिनी रमेश कासले मॅडम यांनी विद्यार्थ्यांचा आहार आरोग्य आणि हायजिन याबद्दल पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रेखाताई तरडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले .अध्यक्षीय भाषणात बोलताना गणेश दादा हाके पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हरिदास सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.