अहमदपूर तालुक्यात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी

अहमदपूर तालुक्यात ईद-उल-फित्र उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : पवित्र रमजान महिन्यातील रोजे पूर्ण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी सोमवार ३१ मार्च रोजी ईद-उल-फित्र मोठ्या उत्साहात साजरी केली. येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईद-उल-फित्रची सामूहिक नमाज अदा करून एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.अहमदपूर शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी सोमवारी ३१ मार्च ईद-उल-फित्रची नमाज अदा करून रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा केली. येथील ईदगाह मैदानावर सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मौलाना मुफ्ती मुहम्मद फाजीलसाब यांच्या नेतृत्वात हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. यावेळी मौलाना मुफ्ती मुहम्मद फाजीलसाब यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी, जागतिक शांततेसाठी, अमन व भाईचारासाठी अल्लाहाकडे दुआ मागितली. तत्पुर्वी मौलाना मुफ्ती मुहम्मद फाजीलसाब यांचे बयान (प्रवचन) झाले.त्यांनी ‘ईद-उल-फित्र’च्या संदर्भाने कुरआन शरिफने दिलेला संदेश, हदीसमध्ये सांगितलेला उपदेश आपल्या बयानमध्ये सांगितला.अल्लाहने ईश्वराने प्रत्येक माणसाला चांगुलपणासह जन्म प्रदान केलेला आहे. परंतु, मानसांतील द्वेष, मत्सर, लोभ, अहंकार यामुळे चांगुलपणा लोप पावत आहे.ऐ अल्लहा आम्ही सर्वजण तुझीच लेकरं आहोत,आमची चुक तुच पदरात घेणार आहेस याचा आम्हाला दृढ विश्वास असल्यामुळे आमच्या चुका माफ करुन पुन्हा एकदा माणुस म्हणून जगण्याची संधी दे, अल्लाह आम्हाला सबुद्धी दे,अशीही प्रार्थना मौलाना मुफ्ती मुहम्मद फाजीलसाब
यांनी अल्लाहकडे केली.नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर ईदगाह मैदानासमोर विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी शुभेच्छा देण्यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, माजी आ.बब्रुवान खंदाडे,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे,
बाजार समितीचे माजी सभापती अॅड.भारत चामे,सहायक पोलिस अधीक्षक(आय पि एस )सागर खर्डे,उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर, उपजिल्हाधिकारी डॉ.मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्जवला पांगरकर, नगरपालिका मुख्याधिकारी संतोष लोमटे, महेश गुपिले, शामराव कुलकर्णी,मुफ्ती मोहसीन अहेमद सहाब, हाफेज खुर्शीद सहाब, अॅड. निखील कासनाळे, माजी नगरसेवक डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, विकास महाजन,माजी सभापती चंद्रकांत मद्दे,माजी नगरसेवक राहुल शिवपुजे, अॅड. टी. एन. कांबळे, आशिष तोगरे, सोमेश्वर कदम, शिवाजीराव देशमुख, अभय मिरकले, राम बेल्लाळे, प्रा. अनिल चवळे, सूर्यकांत अय्या आदी उपस्थित होते.मुस्लीम बांधवांच्या वतीने ईदगाह मैदानावर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांचा सत्कार करण्यात आला.