स्त्रियांनी काल्पनिक आटपाट नगरातून बाहेर पडणे गरजेचे – प्रा.डॉ.भारती मडवई

0
स्त्रियांनी काल्पनिक आटपाट नगरातून बाहेर पडणे गरजेचे - प्रा.डॉ.भारती मडवई

स्त्रियांनी काल्पनिक आटपाट नगरातून बाहेर पडणे गरजेचे - प्रा.डॉ.भारती मडवई

अहमदपूर (गोविंद काळे) : ऐकेविसा व्या शतकातील स्त्री ही वृत्तवैकल्ये, उपवास व अंधश्रद्धा यामध्ये अडकलेली असुन स्त्रीयांनी वृत्तवैकल्या मधील सांगीतलेल्या आटपाट नगरातून बाहेर पडणे गरजेचे असल्याचे मत जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या प्रा.डॉ.भारती मडवई यांनी व्यक्त केले.
त्या अहमदपूर येथील मराठा सेवा संघाच्या आयोजित १९ व्या जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेत ‘स्त्री – काल, आज आणी उद्या’ या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस नुकतेचे जेष्ठ विचारवंत प्रा.मा.म. देशमुख यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना दोन मिनीट स्तब्ध थांबून आदरांजली वाहण्यात आली. तद्नंतर व्याख्यात्या प्रा.डॉ.भारती मडवई यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर अहिल शेख ह्या १३ वर्षीय चिमुकल्याने जिजाऊ वंदना सादर केली.
यावेळी प्रा.भारती मडवई पूढे म्हणाल्या की, प्राचीन भारतीय सिंधू संस्कृतीमधील मातृसत्ताक पध्दतीचे महत्त्व सांगत राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी ताराबाई, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर,फातीमा शेख तसेच स्वातंत्र्यलढयातील अनेक शुरवीर व धाडसी महिलांचे उदाहरणे व दाखले देत स्त्रियांनी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहून प्रत्येक संकटाशी दोन हात करावेत. असेही त्या म्हणाल्या. आजच्या काळातील स्त्रीयांच्यासमोर असलेली आव्हाने सांगताना त्या म्हणाल्या की ज्या घरामध्ये नवरा दारुडा व बायको देवभोळी, अंधश्रद्धाळू आहे त्या घराची प्रगती कधीच होत नाही.त्यांनी आजच्या स्त्रीने मुलांचे योग्य संगोपण व त्याच्यावर योग्य संस्कार करत त्याला मित्र बनवून स्त्रीयांबद्दल आदरभाव अंगी रुजवणे गरजेचे आहे. तसेच स्त्रीही कुटूंबाचा आधार असते त्यामुळे स्त्रीयांनी सशक्त आणी निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. कुटूंबातील सदस्यांसोबत सुसंवादाचा अभाव, वृतवैकल्यामुळे स्त्रीयांचे बिघडत चाललेले आरोग्य, शुल्लक कारणावरून घटस्फोटाचे वाढत चाललेले प्रमाण, महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई व मराठवाडा येथे सर्वाधिक फोफावत चाललेला असुन पुरूषांनी आपल्या कुटुंबामध्ये स्त्रीयांना म्हणजे पत्नी, आई, मुलगी आदींना आदर व सन्मानपूर्वक वागणूक देणे तसेच कुटुंबातील किशोरवयीन मुलांचे पालक होण्यापेक्षा मित्र बनून त्यांच्याशी हितगूज करणे हि आजच्या काळाची नितांत गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दैवशाला लोहकरे, प्रास्ताविक जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्षा मिनाक्षी जाधव, वक्त्यांचा परिचय जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या स्नेहा लांडगे यांनी तर आभार जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा साधना लोहकरे यांनी मानले.
यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, तथा अहमदपूर मधील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार मीडिया पत्रकार व मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!